'मॉब लिचिंग'चे गुन्हे धार्मिक तेढ, राजकीय स्वार्थासाठीच

भारतात किरकोळ कारणांवरून झालेल्या वादाला धार्मिकतेचा रंग देत,  'मॉब लिचिंग'च्या नावाखाली  वातावरण गढूळ करण्याचे प्रकार ठिकठिकाणी घडत आहेत. महाराष्ट्रात 'मॉब लिचिंग'चे चार गुन्हे नोंदवण्यात आले असून या चारही गुन्ह्यात तथ्य नसल्याचे पोलिस तपासात समोर आले आहेत. काही समाज कंटकांनी धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी 'मॉब लिचिंग'चा आधार घेऊन गुन्हा नोंदवल्यात आले असून लवकर या चार पैकी दोन  गुन्ह्यात पोलिस 'बी समरी फाईल' करणार आहेत.

सीसीटीव्ही फुटेज पुरावा

औरंगाबाद शहराची ओळख ही नेहमीच संवेदनशील शहर म्हणून आहे. धार्मिक दंगलीचा या शहराला मोठा इतिहास आहे. याच संवेदनशील शहरात आता मॉब लिंचिंगच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. तर जळगाव आणि यवतमाळमध्ये प्रत्येकी एक गुन्ह्यांची नोंद आहे. औरंगाबादमध्ये २१ जुलैला झोमॅटो या कंपनीत काम करणाऱ्या तरुणाने जय श्री राम म्हणायला लावल्याची तक्रार दिली. पोलिसांनी रातोरात आरोपींना अटक केली.
अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली असता आरोपींनी संबंधित तरुणाशी रस्त्यावर आमची बाचाबाची झाली, पण आम्ही त्याला जय श्री राम म्हणण्याची सक्ती केली नाही, अशी माहिती दिली. याला पुष्टी देणारा आणखी एक पुरावा पोलिसांच्या हाती लागला तो म्हणजे घटनेच्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज. ५० सेकंदाच्या या फुटेजमध्ये कुठेच जय श्री राम म्हणायला लावल्याचं स्पष्ट होत नव्हतं. इतक्या कमी वेळात ही घटना घडू शकत नाही, असा पोलिसांचा संशय आहे. पण असं असलं तरी पोलीस अजूनही कुठल्याही अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत. 

खोटे गुन्हे

यवतमाळ येथील घटनेत तक्रारदाराने जवळच्या व्यक्तीचे आरोपीसोबत पूर्ववैमनस्य होते. त्यामुळे त्याला गुन्ह्यांत अडकवण्यासाठी मॉब लिंचिंगची खोटी तक्रार दिल्याची पोलिसांना दिली आहे. त्यामुळे या गुन्ह्यात पोलिस लवकरच 'बी समरी फाईल' करणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले. तर इतर दोन गुन्हे हे राजकीय स्वार्थासाठी धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने  नोंदवण्यात आले असल्याचे तपासात पुढे आले आहे. मात्र, अद्याप या दोन ही प्रकरणाची चौकशी सुरू आहे. एका मागोमाग एक महाराष्ट्रात मॉब लिंचिंगबाबत नोंदवलेले गुन्हे खोटे असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे सूड भावनेतून दाखल केलेले गुन्हे आता तक्रारदारांच्याच अंगलटी येऊ लागले आहेत.  या तक्रारी खोट्या असतील किंवा खऱ्या, पण या घडवण्यामागे कुणीतरी मास्टरमाईंड असेल तर तोही शोधून काढले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मॉब लिंचिंग विरोधात कलाकार एकवटले

देशभरात मॉब लिंचिंग विरोधात आता कलाकार ही एकवटले आहेत.  देशात दलित आणि मुस्लिम बांधवा सोबत घडलेल्या  मॉब लिंचिंगच्या प्रकारमुळे ४९ कलाकारांनी  थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पञ लिहित चिंता व्यक्त केली आहे. देशात २००९ पासून ते आतापर्यंत २५४ गुन्हे धार्मिक तेढ निर्माण करणारे आहेत. तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याकडे गांभीर्याने पहायला हवे असे पञात म्हटलं आहे.


हेही वाचा -

२० कोटींच्या कोकेनसह ब्राझिलियन नागरिकाला अटक

डोंगरी इमारत दुर्घटनेप्रकरणी अधिकारी, ठेकेदार, ट्रस्टीवर गुन्हा


पुढील बातमी
इतर बातम्या