डोंगरी इमारत दुर्घटनेप्रकरणी अधिकारी, ठेकेदार, ट्रस्टीवर गुन्हा

मुंबईतल्या डोंगरी येथील केसरबाई इमारत दुर्घटनेप्रकरणी डोंगरी पोलिसांनी अखेर ७ दिवसांनी संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि ट्रस्टींविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा नोंदवला. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला होता.

डोंगरी इमारत दुर्घटनेप्रकरणी अधिकारी, ठेकेदार, ट्रस्टीवर गुन्हा
SHARES

मुंबईतल्या डोंगरी येथील केसरबाई इमारत दुर्घटनेप्रकरणी डोंगरी पोलिसांनी अखेर ७ दिवसांनी संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि ट्रस्टींविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा नोंदवला. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला होता.

ही इमारत १६ जुलै रोजी कोसळली होती. या दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, महापालिका, पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्य सुरू केलं. या इमारत दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर अजूनही जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर मुंबई महापालिकेतील एका अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं होतं. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशीचेही आदेश दिले होते.

याप्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्यात सर्व संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि ट्रस्टींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती डोंगरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भागडीकर यांनी सांगितलं. भा. दं. वि. कलम ३३८, ३०४ (अ) आणि ३४ अन्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

इमारतींचं पुन्हा आॅडिट

म्हाडाच्या यादीतील धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचं पुन्हा आॅडिट करण्याचे आदेश म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी दिले आहेत. दरवर्षी म्हाडा मुंबईतील धोकादायक इमारतींची यादी तयार करते आणि संबंधित इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना इमारत खाली करण्यासाठी नोटीस बजावते. 

हेही वाचा-

मुंबई की दुर्घटनांचं शहर?

डोंगरीतील दुर्घटनाग्रस्त बांधकाम आमच्या कार्यक्षेत्रातलं नाही- म्हाडा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा