Advertisement

डोंगरीतील दुर्घटनाग्रस्त बांधकाम आमच्या कार्यक्षेत्रातलं नाही- म्हाडा


डोंगरीतील दुर्घटनाग्रस्त बांधकाम आमच्या कार्यक्षेत्रातलं नाही- म्हाडा
SHARES

डोंगरीतील केसरभाई इमारत ही इमारत म्हाडाच्या कार्यक्षेत्रातील असली, तरी ही इमारत कोसळलेली नाही. तर या इमारतीच्या मागचा अनधिकृत भाग कोसळला आहे. हा कोसळलेला भाग म्हाडाच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचं स्पष्टीकरण म्हाडाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलं आहे. असं असलं तरी ही इमारत म्हाडाची असल्याचा दावा मुंबई महापालिका करत आहे.

काय म्हटलं म्हाडा?

म्हाडाचा घटक असलेल्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील डोंगरी येथील २५/C केसरभाई  ही उपकरप्राप्त इमारत कोसळलेली नसून आजही सद्यस्थितीत उभी आहे. ही  इमारत वास्तव्यास धोकादायक असल्याने २०१८ साली मंडळाने या इमारतीतीलं रहिवाशांना व्हेकेशन नोटीस देऊन रिकामी करवून घेतली आहे व सद्यस्थितीत ही इमारत सुस्थितीत उभी आहे. 

या दुर्घटनेमध्ये  २५/C केसरभाई इमारतीच्या मागील  अनधिकृत बांधकामाचा भाग कोसळला आहे. सदरील अनधिकृत बांधकाम उपकर प्राप्त नसल्याने  मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या कार्यक्षेत्रात मोडत नाही. त्यामुळे या पडलेल्या बांधकामाला म्हाडा जबाबदार नाही’, असं म्हाडाने स्पष्ट केलं आहे.

१४ जणांचा मृत्यू

मंगळवारी डोंगरीतील केसरबाई या ४ मजली  इमारतीचा काही भाग कोसळून त्यात आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. अग्निशमन दल तसंच एनडीआरएफच्या जवानांचं बचावकार्य दुसऱ्या दिवशीही सुरु आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त होतं आहे.


हेही वाचा-

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू

डोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा