Advertisement

डोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत

डोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना सरकारकडून ५ लाख रुपयांची मदत, तर जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. तसंच सर्व वैद्यकीय खर्च देखील देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे दिली.

डोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत
SHARES

डोंगरी येथील तांडेल स्ट्रीटवरील केसरबाई इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला असून, जण जखमी झाले आहेत. जखमींना जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना सरकारकडून ५ लाख रुपयांची मदत, तर जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. तसंच सर्व वैद्यकीय खर्च देखील देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे दिली.

बचावकार्य सुरू

डोंगरीतील केसरबाई-२ ही इमारतीचा अर्धा भाग मंगळावारी सकाळच्या सुमरास कोसळला. या इमारतीमध्ये ४ ते ५ कुटुंब आणि काही व्यावसायिक गाळे होते. त्यावेळी इमारतीजवळच्या बेकरीतील काहीजणांनी सर्वप्रथम घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिस, अग्निशमन जवान आणि एनडीआरएफच्या पथकांनी मदतकार्यक करण्यास सुरूवात केली. मंगळवारी रात्रीपर्यंत ढिगाऱ्याखालून अनेकांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

मृतांची नावे

साबिया निसार शेख (वय २५), अब्दुल सत्तार कालू शेख (वय ५५), मुजमिल मन्सूर सलमानी ( वय १५), सायरा रेहान शेख (वय २५), जावेद इस्माईल (३४), अरहान शेहजाद (४०), कश्यप अमिरजान (१३), साना सलमानी (२५), झुबेर मन्सूर सलमानी (२०), इब्राहिम (दीड वर्ष) , अरबाज (), शहजाद (), यामिन मन्सूरी (५४).

जखमींची नावे

फिरोज नाझिर सलमानी (वय ४५), आयशा शेख (), सलमा अब्दुल सत्तार शेख (५५), अब्दुल रेहमान (), नावेद सलमानी (३५), इम्रान हुसेन कलवानिया (३०), जाविद (३०), जीनत (२५), अलमा मोहम्मद रशिद इद्रिशी (२८).हेही वाचा -

लोकलवरील दगडफेकीत एकात दिवसात ४ जण जखमी

बेस्ट उपक्रमाताली कर्मचाऱ्यांची मुलं होणार कंत्राटी बसचालकRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा