Advertisement

लोकलवरील दगडफेकीत एकात दिवसात ४ जण जखमी

मध्य रेल्वेच्या कुर्ला-विद्याविहार, कुर्ला-शीव आणि कुर्ला-टिळकनगर स्थानकांदरम्यान लोकलवर झालेल्या दगडफेकीमुळं एकाच दिवसात तब्बल ४ प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

लोकलवरील दगडफेकीत एकात दिवसात ४ जण जखमी
SHARES

मध्य रेल्वेच्या कुर्ला-विद्याविहार, कुर्ला-शीव आणि कुर्ला-टिळकनगर स्थानकांदरम्यान लोकलवर झालेल्या दगडफेकीमुळं एकाच दिवसात तब्बल ४ प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. रतनदीप चंदनशिवे, हरिशंकर कहार, तौसिफ खान आणि राजेश पवार अशी या जखमींची नावं आहेत. ही घटना मंगळवारी घडली असून, या घटनेबाबत रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे

दगडफेकीत जखमी

मंगळवारी कुर्ला-टिळकनगर मार्गावर धीम्या लोकलनं प्रवास करत असताना तौसिफ खान हा प्रवासी जखमी झाला. तसंच, विद्याविहार-कुर्ला-सायन मार्गावर रतनदीप चंदनशिवे आणि हरिशंकर कहार हे २ जण जखमी झाले. त्यानंतर कुर्ला-विद्याविहार दरम्यान गॅमन पूलाजवळ एका अज्ञात इसमानं लोकलवर दगड भिरकावल्यानं हा दगड राजेश डोळ्यावर लागला. त्यामुळं राजेश धावत्या लोकलमधून रेल्वे रुळांवर पडला.

भाभा रुग्णालयात दाखल

राजेश पवार हा घाटकोपर येथे राहणारा असून मंगळवारी कॉलेजमधून घरी जाताना दादर स्थानकातून त्यांनं खोपोली जलद लोकल पकडली. या लोकलला प्रचंड गर्दी असल्यानं तो दाराजवळच उभा होता. त्यावेळी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास लोकल कुर्ला-विद्याविहार दरम्यान आली असता, गॅमन पूलाजवळ एका अज्ञात इसमानं लोकलवर दगड भिरकावला. हा दगड त्याच्या डोळ्यावर लागला. त्यावेळी जखमी राजेशला रेल्वे पोलिसांनी उपचारासाठी भाभा रुग्णालयात दाखल केलं.

तक्रारी दाखल

या सर्व घटनांबाबत रेल्वे पोलीसांत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वे पोलीसांकडून कांजूरमार्ग-विक्रोळी-घाटकोपर आणि घाटकोपर-विक्रोळी परिसरात १६ आरपीएफ कर्मचाऱ्यांची गस्तीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय, दगडफेक करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी घाटकोपर-विक्रोळी दरम्यान सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.हेही वाचा -

बेस्ट उपक्रमाताली कर्मचाऱ्यांची मुलं होणार कंत्राटी बसचालक

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळून १३ जणांचा मृत्यूRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा