Advertisement

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू


डोंगरीत ४ मजली इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईतील डोंगरीतील केसरबाई या ४ मजली इमारतीचा अर्धा भाग मंगळवारी दुपारी ११.४०  वाजताच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. जखमींवर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू असून जखमींमध्ये २ लहान मुलांचा समावेश आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सकाळी ४० ते ५० जण अडकले होते. अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू केलं. 

केसरबाई इमारतीचा परिसर अरुंद असल्यानं त्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचण्यास अडथळे निर्माण होत होते. त्यामुळं स्थानिकांच्या मदतीन ढिगारा हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं. ढिगाऱ्यातील एक-एक दगड उचलून न्यावा लागला. दरम्यान, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लहान मुलांना वाचविण्यात यश आल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

Live updates साठी इथं क्लिक करा 



५ कुटुंब राहतात

तांडेल स्ट्रीट अब्दुल हामिद दर्गा परिसरात केसर बाई इमारत आहे. या इमारतीत ५ कुटुंब राहत असल्याचं समजतं. मात्र, या इमारतीच्या कोसळण्याचं कारण अद्याप अस्पष्ट असून, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.


एनडीआरएफचे जवान पोचले

इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ४० ते ५० जण अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. दरम्यान, ही इमारत धोकादायक इमारतीच्या यादीत होती का याबाबत माहिती अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी स्थानिक, अग्निशमन दल, पोलिस आणि एनडीआरएफचे जवानांकडून बचावकार्य सुरू आहे. 

केसरबाई ही इमारत म्हाडाची होती. तसंच या इमारतीच्या परिसरातील इतर इमारती रिकाम्या करण्याचं काम सध्या घटनास्थळी सुरू आहे. दरम्यान, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली महिला आणि लहान मुल अडकल्याची भिती वर्तवली जात आहे.  



दुर्घटनाग्रस्त इमारत १०० वर्षे जुनी होती. धोकादायक इमारतीच्या यादीत तिचा समावेश नव्हता. पुनर्विकासासाठी इमारत विकासकाकडे देण्यात आली होती. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दिली.




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा