Advertisement

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली : Live Updates

SHARE

LIVE UPDATES

07:17 PM, Jul 17 IST
डोंगरी दुर्घटनेचं बचावकार्य पूर्ण

डोंगरीतील केसरबाई इमारत दुर्घटनेनंतर सुरू झालेलं बचावकार्य सुमारे ३० तासांनंतर थांबवण्यात आलं आहे. इमारतीचा संपूर्ण ढिगारा हटवण्यात आला असून बचावकार्य समाप्त झाल्याचं एनडीआरएफने जाहीर केलं आहे. 

11:41 AM, Jul 17 IST
मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली, दुपारी २ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक

या बैठकीला गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, महापालिका आयुक्त प्रविण परदेशी उपस्थित राहणार आहेत.11:35 AM, Jul 17 IST
डोंगरी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बैठकीच आयोजन

मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली, दुपारी २ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक

10:30 AM, Jul 17 IST
डोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत- मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस
09:49 AM, Jul 17 IST
डोंगरीतील केसरबाई मेन्शन इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा १३ वर

मुंताचा आकडा १३ वर, तर ९ जण जखमी


08:09 PM, Jul 16 IST
डोंगरीतील केसरबाई मेन्शन इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा १० वर
08:07 PM, Jul 16 IST
'ती' इमारत म्हाडाची नाहीच

डोंगरी भागातील केसरभाई इमारत ही म्हाडाच्या कार्यक्षेत्रातील असून ती कोसळलेली नाही तर या इमारतीच्या मागील अनधिकृतरित्या बांधलेला भाग कोसळला आहे. हा कोसळलेला भाग म्हाडाच्या कार्यक्षेत्रात येत नाही, असं स्पष्टीकरण म्हाडाने दिलं आहे. 

07:03 PM, Jul 16 IST
डोंगरीतील केसरबाई मेन्शन इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा ७ वर
06:41 PM, Jul 16 IST
दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
06:33 PM, Jul 16 IST
रहिवाशांसाठी संक्रमण शिबिराची व्यवस्था करा- मिलिंद देवरा
06:00 PM, Jul 16 IST
एनडीआरएफ, अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरूच, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
05:56 PM, Jul 16 IST
डोंगरीतील केसरबाई मेन्शन इमारत दुर्घटनेत आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू तर ८ जण गंभीर जखमी


05:42 PM, Jul 16 IST
मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांनी दिली घटनास्थळाला भेट

रहिवाशांच्या संतापानंतर काढता पाय घेतला

05:21 PM, Jul 16 IST
मृतांचा आकडा ४ वर


04:48 PM, Jul 16 IST
मृतांचा आकडा ३ वर
04:48 PM, Jul 16 IST
डोंगरी येथील इमारत दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं दु:ख
03:58 PM, Jul 16 IST
महापालिकेचे सफाई कर्मचारी मलबा उचलण्यासाठी घटनास्थळी दाखल


03:28 PM, Jul 16 IST
इमारतीतीचा भाग कोसळण्याच्या दुर्घटनेतील जखमी आणि मृतांची माहिती

Names of the deceased

1. Sabiya Nisar Shaik F/25 (JJ Hospital)

2. Abdul Sattar Kalu Shaik M/55 (Habib Hospital)


Names of the Injured

1. Firoz Nazir Salmani M/45 (JJ Hospital)

2. Aisha Shaik F/03  (JJ Hospital)

3. Salma Abdul Sattar Shaik F/55 (JJ Hospital)

4. Abdul Rehman M/03 (JJ Hospital)

5. Naved Salmani M/35 (JJ Hospital)

6. Imran Hussain Kalvaniya M/30 (JJ Hospital)

7. One unidentified Male (Habib Hospital)


03:25 PM, Jul 16 IST
म्हाडानं इमारत रिकामी करण्यास सांगत, आम्ही इमारत बनवू असं म्हटलं होतं- नर्जीस फिरोज मंजी, रहिवाशी


03:16 PM, Jul 16 IST
जीवंत मुलीला इमारतीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं


‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा