Advertisement

बेस्ट उपक्रमाताली कर्मचाऱ्यांची मुलं होणार कंत्राटी बसचालक

बेस्टच्या ताफ्यात ऑगस्ट महिन्यापासून भाडेतत्त्वावरील बसगाड्या दाखल होणार आहेत. मात्र, या बसगाड्यांवर बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या मुलांना चालक म्हणून संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

बेस्ट उपक्रमाताली कर्मचाऱ्यांची मुलं होणार कंत्राटी बसचालक
SHARES

बेस्टच्या ताफ्यात ऑगस्ट महिन्यापासून भाडेतत्त्वावरील बसगाड्या दाखल होणार आहेत. मात्र, या बसगाड्यांवर बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या मुलांना चालक म्हणून संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं चालक म्हणून पात्रता पूर्ण होत असल्यास या मुलांना बस चालक म्हणून रोजगाराची संधी मिळणार आहे.

बसगाड्या भाडेतत्त्वावर

बेस्ट खासगी कंत्राटदारांकडून बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहे. तसंच, या बस गाड्यांवर चालक म्हणून नियुक्ती कंत्राटदारच करणार आहे. त्यामुळं चालक म्हणून नियुक्ती करताना बेस्टमधील कर्मचाऱ्यांच्या मुलांकडं समान पात्रता असल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या मुलांना प्राधान्य देण्याच्या सूचना बेस्टकडून कंत्राटदाराला करण्यात आल्या आहेत. त्यासाठी उमेदवाराची उंची १५८ ते १८० से.मी असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडं प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणाचा सार्वजनिक सेवा वाहन चालनाचा बिल्ला आवश्यक आहे. उमेदवारांकडील जड वाहन परवाना १८ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झालेला असणं गरजेचं आहे.

प्रवासी संख्येत वाढ

दरम्यान, बेस्ट उपक्रमाच्या भाडेकपातीच्या निर्णयाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो आहे. भाडेकपातीनंतर आठवडाभरात ८ लाख ६५ हजार प्रवाशांची भर पडली. परंतु, दिवसेंदिवस प्रवासी संख्येत वाढ होतं आहे. मात्र, अपुऱ्या बसगाड्यांमुळं प्रवाशांना बसगाड्यांमधील गर्दीचा सामना करावा लागतो आहे. तसंच अनेकांना बस थांब्यावर बराच वेळ ताटकळत उभं राहावं लागत आहे. कधीकधी ५ मिनिटात बस येते, तर काही वेळेला १५ ते २० मिनिटं झाली तरी बस येत नाही. अशावेळी प्रवासी पर्यायी व्यवस्था म्हणून रिक्षा व टॅक्सीनं प्रवास करतात. त्यामुळं बसगाड्यांच्या तुटवड्यामुळं प्रवासी पुन्हा बेस्टकडं पाठ फिरवतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.



हेही वाचा -

पीक विमा कंपन्यांविरोधात शिवसेनाचा इशारा मोर्चा

ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वे विस्कळीत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा