Advertisement

१५ दिवसांत कर्जमाफीच प्रकरणं निकाली काढा, उद्धव ठाकरेंचं विमा कंपन्यांना अल्टिमेटम

पीक विम्याच्या मुद्यावरुन आता शिवसेना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेना बुधवारी विमा कंपन्याच्या कार्यालावर धडक मोर्चा काढणार आहे.

१५ दिवसांत कर्जमाफीच प्रकरणं निकाली काढा, उद्धव ठाकरेंचं विमा कंपन्यांना अल्टिमेटम
SHARES
  • शेतकऱ्यांसाठी पीक विमा कंपन्यांच्या विरोधात  शिवसेनेचा इशारा मोर्चा
  • खासगी विमा कंपन्यांविरोधात इशारा मोर्चासाठी हजारों शिवसैनिक रस्त्यावर उतरले
  • शिवसेना खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, शिवसेना सचिव आदेश बांदेकर मोर्चासाठी उपस्थित
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात येणार
  • थोड्याच वेळात मोर्चाला होणार सुरुवात
  • राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळाली नसल्यामुळे शिवसेनेन याविरोधात मोर्चा काढला आहे.
  • मोर्चाला जोरदार सुरुवात.
  • वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) ‘भारती अॅक्सा’वर इशारा मोर्चा पोहोचणार आहे.
  • मुंबईत शिवसेनेच्या मोर्चाला सुरुवात
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मोर्चात सहभागी
  • युुवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेही सहभागी
  • विमाकंपन्यांच्या मनमानीविरोधात शिवसेनेचा मोर्चा
  • शिवसेनेचे अनेक नेते आणि पदाधिकारी मोर्चात सहभागी
  • हजारोंच्या संख्येत शेतकऱ्यांचा मोर्च्यात सहभाग
  • पीकविमा प्रश्नावरून शिवसेनेचा आक्रमक पावित्रा
  • शिवसेना मोर्चाला नौटंकी म्हणणारे नालायक - उद्धव ठाकरे
  • ज्यांच अन्न खातोय त्याला आम्ही जागतोय - उद्धव ठाकरे
  • शेतकऱ्यांचा हक्क मिळावा म्हणून शिवसेनेचा मोर्चा
  • मुंबईसाठी रक्त सांडणाऱ्या शेतकऱ्यांशी बांधील 
  • शेतकऱ्यांच्या मोर्च्यात उद्धव ठाकरेंची कॉंग्रेसवर टीका
  • १५ दिवसांत कर्जमाफीच प्रकरणं पूर्ण करा - उद्धव ठाकरे
  • विमा कंपन्या आणि बॅंकांनाही उद्धव ठाकरेंचा इशारा
  • बॅंक खात्यातून शेतकऱ्यांची फसवणूक करू नका - उद्धव ठाकरे
  • शिवसेनेचं शिष्ठमंडळ विमा कंपन्यांच्या भेटीला
  • काळ्या मांजरांविरोधात शिवसेनेचा मोर्चा - उद्धव ठाकरे

पीक विम्याच्या मुद्यावरुन आता शिवसेना आक्रमक झाली असून, शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेना बुधवारी विमा कंपन्याच्या कार्यालावर धडक मोर्चा काढला. वांद्रे कुर्ला संकुलातील (बीकेसी) भारती एक्सा या विमा कंपनीच्या कार्यालयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात हा ‘इशारा मोर्चा’ काढण्यात आला. त्याशिवाय, स्वत: उद्धव ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व केलं. तसंच, 'राज्यातील सर्व विमा कंपन्या आणि बँकांना मी हात जोडून विनंती करतो की, आम्हाला आक्रमक व्हायला लावून का. ज्या शेतकऱ्यांना पीकविमा देण्यात आला आहे तसेच ज्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे, त्यांच्या नावांची यादी या कंपन्यांनी आणि बँकांनी पंधरा दिवसांत आपल्या कार्यालयाच्या दरवाजावर लावावीत, अन्यथा हा मोर्चाच बोलेल' अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना इशारा दिला आहे. 

शिवसेनेची शिष्टमंडळं

वांद्रे कुर्ला संकुलातील (बीकेसी) एशियन हार्ट इन्स्टिट्यूटसमोरील एमएमआरडीएच्या पार्किंग लॉट येथून सकाळी ११ वाजता या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात उद्धव ठाकरेंसह युवासेना प्रमुख आदित्या ठाकरेही सहभागी झाले होते. तसंच, अनेक शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. त्यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळानं विमा कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांची भेट घेतली.

कंपन्याना इशारा

वेगवेगळे निकष लावून पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवत आहेत. त्यामुळं मोर्चाच्या माध्यमातून या कंपन्याना इशारा देण्यात येत आहे. 'शेतकऱ्यांसाठी काढलेल्या या मोर्चाला नौटंकी म्हणणारे नालायक आहेत', अशी टीका उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर केली. 'बीकेसीतील कार्यालये बघितली का नाही ? इथे काही दिवसांनी धडकावे लागणार आहे' असंही उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना म्हटलं. 

काळ्या मांजराविरोधात मोर्चा

त्याशिवाय, 'सरकारनं कर्जमाफीचे पैसे बँकाना दिले तर पैसे गेले कुठे? पीक विमा कंपनी, बँकांचे अधिकारी आणि राज्य सरकारनं एकत्र येऊन बैठक घ्यावी. जी अडचण असेल त्यांनी बैठकीत मांडावी, मात्र शेतकऱ्यांची फसवणूक करु नये, हजारो कोटी रुपये पीक विमा कंपन्यांनी खाल्ले, पंतप्रधान पीक विमा योजना ही पीक विमा कंपन्यांसाठी आणली नाही तर शेतकऱ्यांसाठी आणली आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारला शेतकऱ्यांची जाणीव असेल तर पीक विमा कंपन्यांना का नाही? शेतकऱ्यांच्या योजनांमध्ये येणाऱ्या काळ्या मांजराविरोधात हा मोर्चा आहे' असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. 



हेही वाचा -

ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वे विस्कळीत

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळून १३ जणांचा मृत्यू



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा