आर्थिक चणचणीमुळे माॅडेलनं केली नातेवाईकाच्या घरात चोरी, ओशिवरातील घटना

लाॅकडाऊनमुळे हाताला काम नसल्यामुळे आर्थिक चणचण निर्माण झालेल्या माॅडेलनं, नातेवाईकांच्या घरातच हात साफ केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी २६ वर्षीय माॅडेलला शुक्रवारी अटक केली. शितल नीरज घोलप असे आरोपीचे नाव आहे. २ लाखांचे चोरीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

हेही वाचाः- महानगरपालिका क्षेत्रात फटाके फोडणं किंवा आतषबाजी करण्यावर बंदी

जोगेश्वरी पश्चिम येथील क्रांती नगर मध्ये राहणारी शितल ही एका इन्शुरन्स ऑफिसात अॅडव्हडाटझर म्हणून काम करत होती. त्याच बरोबर ती माॅडेल क्षेत्रातही काम शोधत होती. लाॅकडाऊनमुळे हातचे काम कमी झाल्यामुळे तिच्या माॅडलिंग क्षेत्रातील नाव कमवण्याचे स्वप्न विरळ होत गेलं होतं. त्यात आर्थिक चणचण जाणवू लागल्यामुळे तिने शेवटी नातेवाईकाच्या घरीच चोरीचा कट रचला.  गणेश नगर मध्ये राहणाऱ्या सुनिता आगावणे यांच्या घरी ती काही दिवसांपूर्वी गेली होती. तिला माहिती होते की, आगावणे काही खासगी कामासाठी जाणार आहेत. कामासाठी घरातील मंडळी निघाली पण मुद्दामून घोलप हिने आपला मोबाईल फ्लॅटमध्ये ठेवला. मंडळी इमारतीखाली आली असता घोलप हिने तिचा मोबाईल घरीच राहिल्याचे म्हटले. त्यावर तिने घराची किल्ली घेऊन तेथे जाऊन दागिन्यांची चोरी केली.

हेही वाचाः- ठाकरे सरकारला उशीरा जाग, एसटी कर्मचाऱ्यांना पगार आणि उचल देण्याची घोषणा

या प्रकरणी आगावणे हिने दिलेल्या तक्रारीनुसार ओशिवरा पोलिस तक्रार दाखल केली. त्यावेळी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात कलम ३८० अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली. त्यानुसार अगावणे यांच्या घरी त्यांनी भेट देत त्यांची चौकशी केली असता. घोलप हिने आपला गुन्हा दाखल केला. पोलिसांनी २ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपीला दंडाधिकारी कोर्टात हजर केल्यानंतर शनिवारी जामिन दिला गेला.

पुढील बातमी
इतर बातम्या