ड्रग्ज व्यवसायाच्या वादातून एका सराईत आरोपीने दुसऱ्या सराईत आरोपीचा काटा काढण्यासाठी रचलेला कट गुन्हे शाखा ७ च्या पोलिसांनी उधळून लावला. या गुन्ह्यात हत्येसाठी वापरण्यात येणारी बंदुक आणि चार जिवंत काडतुसांसह पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांनी दिली.
हेही वाचाः- अर्णब गोस्वामी यांना अटकेपासून संरक्षण, न्यायालयाने सचिवांना सुनावलं
सीमा मोहम्मद फैजल खान असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या कक्षाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सुंदरबागर परिसराजवळून सीमाला अटक करण्यात आली. तिच्याजवळीत देशी कट्टा एक पिस्तूल जप्त करण्यात आली होती. प्राथमिक चौकशीनुसार आरोपी महिलेला ही पिस्तुल अश्फाक नावाच्या व्यक्तीने दिले होते. प्राथमिक चौकशीत हा आरोपी सराईत असून सध्या तुरुंगात आहे. ड्रग्सच्या व्यवसायातून बाबा रहीम नावाच्या व्यक्तीचा काटा काढण्यासाठी ही पिस्तुल आणण्यात आली होती. बाबा रहिम सध्या त्याचा व्यक्तीसोबत काम करायचा. पण त्याने तेथून फारकत घेत स्वतःचे वेगळे बस्तान मांडले. त्यातून सूडाची बिजे रुजली होती, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.
हेही वाचाः- मेट्रोच्या विषयावर थेट चर्चेला या! आदित्य ठाकरेंना आव्हान
या महिलेच्या दाव्यांची पडताळणी करण्यात येणार असल्याचे अधिका-याने सांगितले. याप्रकरणी हत्यार ंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष ७ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई, निरीक्षक श्रीशंकर, सहायक पोलिस निरीक्षक संतोष मस्तूद, महिला हवालदर स्नेहा नाईक, महिला पोलिस नाईक सरिता शिंदे, पोलिस नाईक मुरलीधर सपकाळे, पोलिस नाईक नागनाथ जाधव, पोलिस शिपाई गणेश पाटील यांच्या पथकाने ही महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली.