चक्क मुंबई पोलीसच मद्यधुंदावस्थेत

'ड्रिंक अँड ड्राईव्ह' म्हणजेच 'दारू पिऊन गाडी चालवू नये', अशी सूचना फलक रस्त्यांवर लावलेली असते. जर हा नियम चालकाने मोडल्यास पोलीस त्यांच्याविरोधात कारवाई करतात. पण जेव्हा पोलीसच ड्रिंक अँड ड्राईव्ह करून नियम मोडत असतील असे म्हटल्यास तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे.

कांदिवलीच्या वेस्टर्न एक्स्प्रेस हाय-वे जवळील साईधाम मंदिराच्या समोर एक पोलीस कर्मचारी सर्वांच्या गाड्यांना धडक देत सरळ पुढे जात होता. तेव्हा हा पोलीस कर्मचारी मद्यधुंदावस्थेत असल्याची शंका तेथील नागरिकांना आल्यानंतर त्यांनी त्या पोलिसाची गाडी कसेबसे अडवली आणि त्याला कस्तूरबा पोलीस ठाण्यात नेत त्याच्याविरोधात ड्रिंक अँड ड्राईव्हचा गुन्हा नोंदवला.


हेही वाचा - 

मद्यपान करताय... होऊ शकतो यकृताचा आजार


पुढील बातमी
इतर बातम्या