Advertisement

मद्यपान करताय... होऊ शकतो यकृताचा आजार


मद्यपान करताय... होऊ शकतो यकृताचा आजार
SHARES

दारुचं व्यसन हे आरोग्यासाठी किती घातक आहे, हे खरंतर सर्वांना माहीत आहे. तरीही, मुंबईसह महाराष्ट्रात दारुच्या व्यसनाचं प्रमाण जास्त आहे. कुठल्याही व्यसनाचा त्रास त्या व्यक्तीसह कुटुंबीयांनाही होत असतो.

दारुच्या व्यसनामुळे सर्वात जास्त परिणाम होतो तो म्हणजे यकृतावर. म्हणजेच, यकृताचा सिरॉसिस, फॅटी लिव्हर, लिव्हर फेल्युअर, यकृताचा कॅन्सर असे आजारांना आयतं निमंत्रण मिळतं.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, दीर्घकालीन यकृत आजारांमुळे फक्त भारतात दरवर्षी अडीच लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. तसंच गेल्या 5 वर्षात यकृत खराब झालं म्हणून प्रत्यारोपणाच्या केसेसमध्ये वाढ झाली आहे.  

एखाद्या व्यक्तीला यकृताचा आजार झाला तर पाच वर्षांत खासगी वैद्यकीय उपचारांसाठी २५ लाखांहून अधिक खर्च करावा लागतो.


काय सांगतो जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल?

भारताची लोकसंख्या जेव्हा 115.17 कोटी होती, तेव्हा 67 टक्के प्रौढ व्यक्ती 2.6 लिटर निव्वळ अल्कोहोल घेत होते. आता तर भारताची लोकसंख्या 125 करोडच्या वर गेली आहे. त्यामुळे आता याचं प्रमाण आणखी वाढलंय.

यकृत शरीरात सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. शरीरातील 77 टक्के ‘चांगल्या’ कोलॅस्टेरॉलची निर्मिती करतो. यकृतामध्ये ‘पित्त’ या घटकाची निर्मिती होते. पित्तामुळे शरीरातील मेदाचं पचन होतं. यकृतामुळे शरीरातील रक्त साकळण्याची क्षमताही वाढते. त्यामुळे रक्ताची गुठळी होण्यास मदत होते. या क्रियेचा फायदा शरीराला इजा झाली असता रक्ताचा अतिप्रवाह थांबतो.

डॉ. अमित गुप्ते, गॅस्ट्रोएंट्रोलॉजी आणि हेपेटोलॉजी सल्लागार, वोक्हार्ट हॉस्पिटल


पण, गेल्या काही वर्षात चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे यकृताच्या कार्यक्षमतेवर फरक पडला आहे. प्राथमिक अवस्थेत यकृताच्या आजाराची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे आजार शेवटच्या पातळीवर गेल्यावरच त्याचे निदान होते.

डोक्यापासून पायापर्यंत आपल्या शरीराचा असा कोणताही अवयव नाही, जिथे दारूचा विपरीत परिणाम होत नाही. योग्य वेळी निदान करून तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतल्यास यकृताच्या आजारांवर नियंत्रण ठेवता येते. पण, काही कालावधीनंतर रुग्णाला यकृत प्रत्यारोपणाची गरज पडते.

डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा