Mumbai Police to hold flag march मालाडच्या आप्पापाडा परिसरात पोलिस आयुक्त ध्वजमार्च काढणार

उत्तर मुंबई  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, प्रशासनाकडून युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत.  कोरोनाचे हे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी या परिसरात लाँकडाऊन देखील वाढवला. पालिकेनेही या परिसरात घरोघरी कोरोना चाचण्या वाढवल्या आहेत. या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये, तसेच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोलिस आयुक्त परमबिर सिंग उद्या सकाळी या परिसराला भेट देणार असल्याचे  उत्तर मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त दिलीप सावंत यांनी सांगितले.

हेही वाचाः- Salons open: २८ जूनपासून सलून सुरू, फक्त केसच कापणार

मुंबईत धारावीनंतर मालाडमधील आप्पापाडा ही झोपडपट्टी मागील काही वर्षात नावारुपाला आली. चिंचोळ्यागल्या, अरुंद रस्ते यामुळे या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत  गेला. सध्या कोरोनाचा नवा हाँटस्पाँट म्हणून हा परिसर ओळखला जाऊ लागला आहे. त्यामुळेच पोलिसांनी या परिसरात लाँकडाऊनचे नियम शिथील न करता. हा परिसर पूर्णतहा बंद ठेवलेला आहे. पालिकेने ही या परिसरातील कोरोना संक्रमनावर नियंत्रण मिळवण्यासाठी घरोघरी जाऊन कोरोना चाचण्या करण्यास सुरूवात केली आहे. या परिसरात दररोज कोरोनाचे नवे रुग्ण समोर येत असल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच परिसरात कायदा व सुव्यवस्थेसह  परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्वतः पोलिस आयुक्त परमबीर सिंह  हे शुक्रवारी सकाळी १० वा. या परिसराला भेट  देणार आहे. त्यावेळी परमबीर सिंह यांच्या नेतृत्वाखाली परिसरात मोठा ध्वजमार्च ही काढला जाणार आहे.

हेही वाचाः-CBSC Exams : बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द

या पूर्वी धारावीत पोलिसांनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्वात मोठा ध्वज मार्च काढला होता. त्यावेळी देखील पोलिस आयुक्त  परमबीर सिंह हे या ध्वज मार्चला उपस्थित रहात पोलिसांचे मनोबल वाढवले होते.  तर काही दिवसांपूर्वी जे.जे पोलिस ठाण्यात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या वाढत असताना. आयुक्तांनी त्या ठिकाणी जाऊन पोलिसांना मार्गदर्शनकरत त्याचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला होता. शुक्रवारी देखील परमबीर सिंह हे मालाड परिसरात ध्वज मार्च काढून नागरिकांना लाँकडाऊनचे पालक करण्याबाबतचे आवाहन करणार असल्याचे समजते.  

पुढील बातमी
इतर बातम्या