महाराष्ट्र भ्रष्टाचारात अव्वल स्थानावर

राष्ट्रीय गुन्हे (crimes) नोंद ब्युरो (NCRB) च्या ताज्या अहवालानुसार, 2023 मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत देशात सर्वाधिक 763 प्रकरणे राज्यात नोंदवली गेली होती.

कॉपीराइट उल्लंघनाच्या प्रकरणांमध्येही राज्य अव्वल स्थानावर होते. राज्यात अशी 335 प्रकरणे नोंदली गेली ज्यात 340 लोकांनी बळी असल्याचा दावा केला आहे, असे अहवालात म्हटले आहे.

भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये 216 प्रकरणांसह उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर होता. 2023 मध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत 960 प्रकरणे नोंदवून महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर होता.

21,870 आयटी कायद्याच्या प्रकरणांसह कर्नाटक अव्वल स्थानावर होता. कॉपीराइट कायद्यांतर्गत महाराष्ट्रात (maharashtra) सर्वाधिक (335) प्रकरणे नोंदली गेली.

तसेच कर्नाटक 204 प्रकरणांसह आणि उत्तर प्रदेश 198 प्रकरणांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होता, असे अहवालात म्हटले आहे.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत अनुसूचित जातींवरील गुन्ह्यांचा विचार केला तर, महाराष्ट्र 340 प्रकरणांसह देशात दुसऱ्या क्रमांकावर होता.

तसेच उत्तर प्रदेशात अनुसूचित जातींवरील गुन्ह्यांची 2771 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.


हेही वाचा

मीरा रोडमधील सोसायटीतील गरबा कार्यक्रमात अंडी, टोमॅटो फेकली

समृद्धी महामार्ग लवकरच ठाणे शहराला जोडणार

पुढील बातमी
इतर बातम्या