मलबार हिलमध्ये कचराकुडीत सापडलं नवजात मूल

एका कचराकुंडीत एक नवजात मूल सापडल्याची धक्कादायक घटना मुंबईतील मलबार हिल परिसरात घडली आहे. मलबार हिलमधल्या प्रियदर्शनी पार्क येथील कचराकुंडीत हे मूल सापडलं असून, याप्रकरणी मलबार हिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवजात मूल

प्रियदर्शनी पार्कच्या नजीकच एक सार्वजनिक सुलभ शौचालय आहे. सकाळी या शौचालयाशेजारी असलेल्या कचराकुंडीत चादरीत गुंडाळलेलं नवजात मूल रडताना आढळलं. नागरिकांनी या मुलाला बाहेर काढून याबाबतची माहिती मलबार हिल पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या मुलाला ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले.

वेळीच उपचार

या नवजात बाळावर वेळीच उपचार केल्यानं त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. तसंच, बेवारस म्हणून फेकणाऱ्या व्यक्तीविरोधात मलबार हिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक संबंध, प्रेमप्रकरण किंवा मुलगी नको म्हणून हे कृत्य करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून, याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.


हेही वाचा -

आंदोलन, जाळपोळ, दंगली सरकारला हवंच आहे - राज ठाकरे

आता रस्त्यावर उतरून आंदोलनाची वेळ- फरहान अख्तर


पुढील बातमी
इतर बातम्या