Advertisement

आता रस्त्यावर उतरून आंदोलनाची वेळ- फरहान अख्तर

'सोशल मीडियावर निषेध करण्याची वेळ निघून गेली असून, आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आल्याचं' ट्विट बाॅलिवूड अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तर याने केलं आहे.

आता रस्त्यावर उतरून आंदोलनाची वेळ- फरहान अख्तर
SHARES

सुधारीत नागरिकत्व कायद्यावरून बाॅलिवूडमधूनही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 'सोशल मीडियावर निषेध करण्याची वेळ निघून गेली असून, आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आल्याचं' ट्विट बाॅलिवूड अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तर याने केलं आहे.

हेही वाचा- 'जामिया'चा विद्यार्थी असूनही तू गप्प का? रोशन अब्बासने शाहरूखला डिवचलं

या कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीचा निषेध करण्यासाठी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान इथं १९ डिसेंबरला दुपारी ४ वाजता विविध समविचारी संघटनांनी निषेध मोर्चाचं आयोजन केलं आहे. अभिनेता फरहान अख्तरने या मोर्चाला मोठ्या संख्येने येण्याचं आवाहन ट्विटरवरून केलं आहे.

हेही वाचा- युवाशक्तीचा बाॅम्ब पेटवू नका, ‘जामिया’वरून केंद्र सरकारला मुख्यमंत्र्यांचा इशारा

 'CAA आणि NRC नेमकं काय आहे? या दोघांचा परस्पर संबंध काय आहे?' याची संक्षिप्त माहिती देणारं पत्रकही त्यानं आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केलं आहे. 


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement