Advertisement

'जामिया'चा विद्यार्थी असूनही तू गप्प का? रोशन अब्बासने शाहरूखला डिवचलं

अनेक कलाकार विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी #IstandWithJamiaMilliaStudents या हॅशटॅग वापरून ट्वीट करत आहेत. याप्रकरणी रेडिओ जॉकी आणि कलाकार रोशन अब्बास यांनी शाहरुखला टॅग करत ट्वीट केलं आहे.

'जामिया'चा विद्यार्थी असूनही तू गप्प का? रोशन अब्बासने शाहरूखला डिवचलं
SHARES

नागरीकत्व कायद्याचा देशभरातून विरोध केला जात आहे. दिल्लीतील जामिया मिल्लिया इस्लामिया युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून या कायद्याच्या विरोधात प्रदर्शन करत आहेत. रविवारी या युनिव्हर्सिटीतल्या काही विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईचा अनेक बॉल्वूड सेलिब्रिटींनी विरोध केला. पण किंग खान या विषयावर गप्प का आहेत? असा प्रश्न रेडिओ जॉकी आणि कलाकार रोशन अब्बास यांनी उपस्थित केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकरमावर बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी ट्वीटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या आहेत. रेणुका शहाणे, अनुराग कश्यप, सुशांत सिंह असे अनेक कलाकार विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी #IstandWithJamiaMilliaStudents या हॅशटॅग वापरून ट्वीट करत आहेत. याप्रकरणी रेडिओ जॉकी आणि कलाकार रोशन अब्बास यांनी शाहरुखला टॅग करत ट्वीट केलं आहे.

रोशन अब्बास म्हणाले की, शाहरुख खान तुम्ही या मुद्द्यावर काही तरी बोला. तुम्ही स्वत:हा जामियातून आहात. कोणी तुम्हाला गप्प केलं आहे? शाहरुख खान तर जामिया मिल्लिया युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी होते तरी देखील त्यांनी यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.

रोशन अब्बास यांच्या ट्वीटवर काही नेटकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे तर काहींनी नाराजी दर्शवली आहेहेही वाचा

जामिया हिंसाचार: कायदा शिकवणाऱ्या जावेद अख्तर यांना आयपीएसने सुनावलं

भाजपचं ‘आयटी सेल’च खरी तुकडे तुकडे गँग, अभिनेत्री रेणुका शहाणेची मोदींवर खरमरीत टीका

संबंधित विषय
Advertisement