NIA कडून दाऊदवर 25 लाखांचे बक्षीस जाहीर

FILE PHOTO
FILE PHOTO

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आणि त्याच्या साथीदारांवर बक्षीस जाहीर केले आहे. एनआयएने दाऊद आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांविरोधात याआधीच गुन्हे दाखल केले आहेत. त्यानंतर एनआयएने दाऊद आणि त्याच्या टोळीतील इतर गँगस्टरविरोधात बक्षीस जाहीर केले आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. तर, त्याचा विश्वासू सहकारी समजला जाणऱ्या छोटा शकीलवर 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम, जावेद पटेल उर्फ जावेद चिकना आणि टायगर मेमनवर प्रत्येकी 15 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसह इतर टोळीच्या सदस्यांवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तपास यंत्रणेकडून याचा तपास सुरू आहे.

एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त राष्ट्र संघाने दाऊद इब्राहिमला जागतिक दहशतवादी जाहीर केले आहे. त्याशिवाय भारतातही दाऊदविरोधात दहशतवाद प्रतिबंध कायद्यानुसार (UAPA) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींकडून आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्क चालवण्यात येत असल्याचे एनआयएने म्हटले आहे. दाऊद इब्राहिमकडून डी-कंपनी ही टोळी चालवण्यात येते. यामध्ये हाजी अनिस उर्फ अनिस इब्राहिम शेख, शकील शेख उर्फ छोटा शकील, जावेद पटेल उर्फ जावेद चिकना, इब्राहिम मुश्ताक अब्दुल रझाक मेमन उर्फ टायगर मेमन आणि इतरांचा टोळीत समावेश आहे.


हेही वाचा

आदित्य ठाकरेंच्या नावाने फसवणूकीचा प्रयत्न, भामट्याविरोधात गुन्हा दाखल

धक्कादायक! झोपेत असताना पतीने पत्नीला ट्रेनखाली ढकलले, सीसीटीव्ही व्हायरल

पुढील बातमी
इतर बातम्या