आदित्य ठाकरेंच्या नावाने फसवणूकीचा प्रयत्न, भामट्याविरोधात गुन्हा दाखल

शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव वापरून फसवणूक करण्याचा प्रयत्न सायबर भामट्यांनी केला आहे.

आदित्य ठाकरेंच्या नावाने फसवणूकीचा प्रयत्न, भामट्याविरोधात गुन्हा दाखल
SHARES

पोलिस अधिकारी, न्यायाधीश यांच्यानंतर आता शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव वापरून फसवणूक करण्याचा प्रयत्न सायबर भामट्यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात येणाऱ्या वरळी कोळीवाड्यातील एका २४ वर्षीय व्यावसायिक कुस्तीपटूला व्हॉट्सॲपवर ठाकरे यांच्या नावाने संपर्क साधून त्याच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दादर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

दिपेश जांभळे हा व्यावसायिक कुस्तीपटू २३ ऑगस्ट रोजी घरी असताना सकाळी त्याला अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सॲप संदेश आला. त्या प्रोफाईलवर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र ठेवण्यात आले होते.

संदेश पाठवाऱ्याने प्रथम दिपेशची विचारपूस केल्यानंतर तू आता कोठे आहेस, असे विचारले. त्यावर त्याने घरी असल्याचे सांगितले. त्यावेळी मी आदित्य ठाकरे आहे, मला ओळखलं ना? असे विचारल्यानंतर हो, पण मी जरा गोंधळलोय, असे उत्तर दिपेशने दिले. त्यानंतर तुझ्याकडे पेटीएम आहे का असे विचारून माझ्या मित्राला २५ हजार रुपये तात्काळ पाठव, असे आरोपीने सांगितले. आरोपीने दूरध्वनी क्रमांक देऊन वारंवार तात्काळ पैसे पाठव, मी माझ्या खात्यावरून उद्या सायंकाळपर्यंत रक्कम देतो, असे सांगितले.

दिपेशला संशय आल्यामुळे त्याने स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्याशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर दिपेशने याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.



हेही वाचा

धक्कादायक! झोपेत असताना पतीने पत्नीला ट्रेनखाली ढकलले, सीसीटीव्ही व्हायरल

9 वर्षांपूर्वी अपहरण झालेली मुलगी सापडली, पोलिसांनी केलं आईकडे सुपूर्द

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा