धक्कादायक! मित्राकडूनच मित्राची हत्या

रविवारी संध्याकाळी पनवेलमधील (panvel) पाच मित्रांच्या पार्टीने जीवघेणे वळण घेतले. पार्टीदरम्यान 5 मित्रांमध्ये भांडण वाढले आणि त्यापैकी एकावर चाकूने वार करण्यात आला. विजय काळसे (27) असे मृताचे नाव आहे.

रवी मेवाती (30), राहुल मेवाती (28), तरुण वालिमिकी (28) आणि एक अनोळखी व्यक्ती अशी मित्रांची नावे आहेत. ते सर्वजण पनवेल तालुक्यातील उसर्ली गावात पार्टी करत होते.

मृत विजय काळसे आणि रवी मेवाती यांच्यात झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि मेवाती यांनी काळसे याच्या छातीवर चाकूने वार (assaulted)  केल्याने त्याचा मृत्यु (death) झाला. हे सर्वजण दारूच्या नशेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मृत विजय काळसे चाकूच्या हल्ल्यामुळे जमिनीवर कोसळल्यानंतर मित्रांनी रुग्णवाहिका बोलावून त्याला पनवेल उपजिल्हा रुग्णालयात नेले. काळसे याला रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले. 

आपल्या मित्राचा जखमी अवस्थेत मृत्यू झाल्याचे समजताच घाबरलेल्या चौघांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना याची माहिती दिली.

“वादामुळे दोघांनी एकमेकांना मारहाण केली आणि शेवटी चाकूचा वार करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

या प्रकरणाचा कोणताही सुगावा नसताना, पोलिसांनी रुग्णवाहिका चालकाने दिलेल्या माहितीवर अवलंबून आहेत. पोलिसात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये चालक हा प्राथमिक तक्रारदार होता. त्यांनी रुग्णवाहिकेत मृतकासोबत असलेले दोन मित्र आणि स्कूटरवरून त्यांच्यामागे येणाऱ्या दोन मित्रांची माहिती दिली. 

रात्री 8.40 वाजता डॉक्टरांनी काळसे याला मृत घोषित केल्यानंतर लगेचच, फोन कॉलला उत्तर देण्याच्या बहाण्याने दोन मित्र पळून गेले. तर प्राथमिक आरोपीला रुग्णवाहिका चालकाने रोखले. परंतु, पोलिसांना माहिती देताना तोही फरार झाला.

“मित्रांनी रुग्णवाहिका चालकाला खोटे सांगितले की, काळसे हा अपघात होऊन पडला आहे आणि त्याला वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे.

 प्राथमिक आरोपी रवी मेवातीचा कामोठे येथील नातेवाइकाच्या ठिकाणी शोध घेण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली,” असे पोलिसांनी सांगितले.

भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) (व्यक्तींच्या गटाद्वारे खून) आणि 3(5) (दोन किंवा अधिक समान हेतूने कृत्य केल्यास संयुक्त गुन्हेगारी दायित्व) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.


हेही वाचा

गणेशोत्सवात हायकोर्टाचा लाईट लेझर बीम, डीजे सिस्टिमचा वापर रोखण्यास नकार

Badlapur News : बदलापुरातील तब्बल 300 आंदोलकांवर गुन्हे

पुढील बातमी
इतर बातम्या