Advertisement

गणेशोत्सवात हायकोर्टाचा लाईट लेझर बीम, डीजे सिस्टिमचा वापर रोखण्यास नकार

गणेशोत्सवा दरम्यान वाजवणारे डीजे सिस्टिम आणि लाईट लेझर बीम हे आरोग्यासाठी घोकादायक असल्याची याचिका करण्यात आली.

गणेशोत्सवात हायकोर्टाचा लाईट लेझर बीम, डीजे सिस्टिमचा वापर रोखण्यास नकार
SHARES

गणेशोत्सवाबरोबरच धार्मिक मिरवणुका, सण-उत्सव व इतर समारंभांमध्ये लेझर बीम आणि मोठ्या आवाजाच्या ध्वनी प्रणालीचा वापर करण्यावर आक्षेप घेणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली.

मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने 2020च्या ध्वनीप्रदूषण नियमावलीतील आवाज मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या लाऊडस्पीकर आणि इतर साऊंड सिस्टिमवर बंदी घालण्याची मागणी फेटाळून लावली आहे.

तसेच याचिकाकर्त्यांना योग्य प्राधिकरणाकडे दाद मागावी, असे निर्देश दिले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे गणेशोत्सवात डीजे, लाऊडस्पीकरचा आवाज घुमण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सण-उत्सवांमध्ये वापरण्यात येणारे लेझर बीम धोकादायक आहेत. त्यामुळे अनेकांची दृष्टी गेली असून डीजे सिस्टिम व तत्सम अन्य प्रणालींपासून होणाऱ्या ध्वनिप्रदूषणामुळे अनेकांना ऐकू न येण्याची समस्या निर्माण झाली आहे.

ध्वनिप्रदूषणामुळे आसपासच्या इमारतींमध्ये कंपने निर्माण होतात, असा दावा करून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.

या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने सुनावणी झाल्यानंतर राखून ठेवलेला निर्णय जाहीर केला. यामुळे लाईट लेझर बीम, डीजे सिस्टिमचा वापर रोखण्यास हायकोर्टाचा नकार देत याचिका निकाली काढली.



हेही वाचा

Ganesh Utsav : पीओपीवरील बंदीला भाजपाचा विरोध

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धेचे आयोजन

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा