गँगस्टर गुरू साटमचे ५ हस्तक जेरबंद

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

मुंबईतल्या नामवंत व्यावसायिकाला खंडणी मागितल्याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी कुख्यात गुंड गुरू साटमच्या ५ हस्तकांना नुकतीच अटक केली आहे. अमोल शंकर विचारे, भरत प्रदीप सोलंकी, राजेश यशवंत आंब्रे, बिपीन धोत्रे, दिपक जयंतीलाल लोढीया अशी या पाच आरोपींची नावे आहेत. आरोपींना न्यायालयाने २१ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

धमकावून पैसे उकळले

या व्यावसायिकाकडून  मागील अनेक दिवसांपासून डाॅन गुरू साटमच्या नावाखाली हे आरोपी  धमकावून पैसे उकळत होते. मात्र, दिवसेंदिवस या गुंडाची पैशांची मागणी वाढतच होती. याला कंटाळून अखेर व्यावसायिकाने गुरू साटमला पैसे देणे बंद करून पोलिसात तक्रार नोंदवली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून विविध ठिकाणाहून या पाच अारोपींना अटक केली.

हत्येच्या गुन्ह्यातील अारोपी

अारोपींमधील अमोल शंकर विचारे हा हत्येच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून कारागृहाबाहेर आला आहे. तर भरत हा विविध गुंडांसाठी व्यावसायिकांना धमकावतो. राजेश हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर ५० गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तर बिपीन हा खंडणीतील पैसे परदेशात डाॅनपर्यंत पोहचवायचा. दिपक हा संबधीत व्यावसायिकांची माहिती डाॅनला पुरवण्याचं काम करतो. शहरातील अन्य किती व्यावसायिक या टोळीच्या निशाण्यावर होते याचा आता पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त दिलीप सावंत यांनी दिली.


हेही वाचा -

मोबाइल चार्जिंगसाठी चक्क सीसीटीव्ही केले बंद, १७ जणांवर गुन्हे दाखल

कल्याणमध्ये खड्ड्याचा आणखी एक बळी


 

पुढील बातमी
इतर बातम्या