शिवडीतून दुर्मिळ कासवाची तस्करी, दोघांना अटक

आजच्या आधुनिक युगातही अनेकजण अंधश्रद्धेच्या गाळात रुतलेले असल्याचे वास्तव मुंबईच्या शिवडीत स्टार प्रकारातील कासवाच्या तस्कराच्या माध्यमातून समोर आले आहे. पैशाचा पाऊस पाडण्याच्या अंधश्रद्धेतून कासवाची ही तस्करी होत असल्याची गंभीर बाबही या निमित्ताने समोर आली आहे. अंगावर चांदणीसारखे रेखाटण असलेली पाच कासवे पोलिसांनी आरोपीकडून ताब्यात घेतली आहेत.

हेही वाचाः- अकरावीचे राहिलेले प्रवेश प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर

शिवडी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक किरण मांडरे, हवालदार आवकिरकर, पोलीस शिपाई देठे, पोलिस शिपाई मोरे, पोलीस शिपाई  मेटकरी,पोलीस शिपाई  महाडिक हे गस्त करित असताना. नाकाबंदी दरम्यान आरोपी मोहम्मद यासीन रमजान अली मोमीन (२४), अजगर अली लियाकत अली शेख (३२) या दोघांजवळ एका पिशवीत ५ स्टार कासव आढळून आले. पोलिसांनी या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी त्या दोघांनी ही दुर्मिळ कासवं ही हैद्राबादहून तस्करीसाठी आणली असल्याची माहिती पोलिसांना दिली.

हेही वाचाः- येत्या २४ तासात पावसाची शक्यता

या माहितीच्या आधारावर शिवडी पोलिसांनी आरोपींवर कलम ९, ३९, ३९(ड),४८, ४९(अ), ४९, ५० व ५१ वन्यजीव सरक्षण अधिनियम १९७२ अन्व्ये गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली आहे. या कासवांची बाजारात किंमत ही दीड लाख रुपये इतकी आहे. या तस्करीमागे दुर्मिळ वन्य प्राण्यांची तस्करी करणाऱ्या इंटरनॅशनल टोळीचा हात असल्याचा संशय पोलिसांना असून त्या अनुशंगाने तपास सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली.  

पुढील बातमी
इतर बातम्या