अॅमेझॉनवर मागवला मोबाईल मिळाला साबण

ऑनलाइन पद्धतीने आवेष्टित वस्तूंची विक्री करून ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. दहिसरमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. दहिसर पश्चिमेतील कांदरपाडा येथे राहणाऱ्या एका महिलेने अॅमेझॉनवर मोबाईल फोन मागवला होता. मात्र त्यांना मोबाईल फोनऐवजी साबण पाठवण्यात आल्याचे समोर आले आहे.


हेही वाचा - 

ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

अॅमेझॉनला पडला भारताचा हंटर


मिलन सप्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 मे रोजी त्यांनी अॅमेझॉनवर रेड मी नोट 4 मोबाईलची ऑर्डर दिली होती. काही दिवसांनतर त्यांना ऑर्डर मिळाली मात्र बॉक्स उघडताच त्यांना मोबाईल ऐवजी कपडे धुण्याचे दोन व्हिलचे साबण मिळाले. याबाबतची माहिती त्यांनी अॅमेझॉन कंपनीला दिली असून, याबाबत त्यांनी ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत न्यायालयात दाद मागितली आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या