Advertisement

अॅमेझॉनला पडला भारताचा हंटर


अॅमेझॉनला पडला भारताचा हंटर
SHARES

मुंबई - ऑनलाईन सेल कंपनी असलेल्या अॅमेझॉनला त्यांचं एक प्रॉडक्ट चांगलंच महागात पडलंय. अॅमेझॉननं आपल्या कॅनडातल्या वेबसाईटवर भारताचा राष्ट्रध्वज असलेल्या तिरंग्याच्या डिझाईनचं पायपुसणं विक्रीसाठी ठेवलं होतं. याचे फोटो व्हायरल होताच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी लागलीच या प्रकाराची गंभीर दखल घेतली. 

ट्विटरवरून सुषमा स्वराज यांनी अॅमेझॉनला खडे बोल सुनावले. हे वादग्रस्त प्रॉ़डक्ट अॅमेझॉननं लागलीच मागे घ्यावं असं स्वराज यांनी सुनावलं. तसेच या गंभीर चुकीबद्दल अॅमेझॉननं बिनशर्त माफी मागावी असंही सुषमा स्वराज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

 

 

कंपनीनं बिनशर्त माफी न मागितल्यास अॅमेझॉनच्या भारतात येणा-या कर्मचा-यांना व्हिसा नाकारण्याचा इशाराच स्वराज यांनी दिला. तसेच अॅमेझॉनचे जे कर्मचारी सध्या भारतात आहेत, त्यांचा व्हिसाही लागलीच रद्द करण्यात येईल असंही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय.

 

भारत सरकारकडून घेतल्या गेलेल्या कठोर भूमिकेनंतर अॅमेझॉन कंपनी प्रशासनानं माघार घेत हे प्रॉ़डक्ट आपल्या वेबसाईटवरून मागे घेतलं आहे. अॅमेझॉनच्या वेबसाईटवर भारतासोबतच इंग्लंडच्या राष्ट्रध्वजाच्या डिझाईनचंही पायपुसणं विक्रीसाठी ठेवण्यात आलं आहे. सोशल मीडियावरुन या वेबसाईटच्या पेजचे स्क्रीनशॉट काढून व्हायरल केले जात आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा