पैशांचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

मुंबईच्या कफपरेड परिसरात ११ वर्षीय अल्पवयीन मुलीला पैशांचे आमीष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कफपरेड पोलिसांनी अशोक जाधव (५५) याला अटक केली आहे. अशोकने या पूर्वी ही पीडित मुलीच्या ९ वर्षीय चुलत बहिणीसोबत असे कृत्य केल्याचे पोलिस तपासात उघड झाले असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार डोंगरे यांनी सांगितले. 

 हेही वाचाः- ..तर कोरोनाग्रस्त रुग्णांना स्थानबद्ध करणार- राजेश टोपे

 पीडित मुलगी आणि अटक आरोपी हे कफपरेड येथील एकाच परिसरात राहतात. याबाबत पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली असून, त्यानुसार आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील छोटे मोठे काम करून स्वतःचा उदरनिर्वाह करतात. त्यामुळे दोघेही बहुतांश वेळ घराबाहेर असतात. पीडित मुलगी घरी एकटीच असते. आरोपी हा त्यांच्या घराजवळ राहण्यास असून, तो खासगी कंपनीत कामाला आहे. रविवारी पीडित मुलगी घराबाहेर एकटीच असल्याचे पाहून अशोकने तिला २० रुपये देण्याचे आमीष दाखवून घरी बोलवून घेत तिच्यावर अत्याचार केले. अशोकने केलेल्या कृत्यामुळे पीडित मुलगी वेदनांनी असह्य झाली होती. अशोकने केलेल्या कृत्याची माहिती तिने घरातल्यांना सांगितल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. 

हेही वाचाः- Corona virus : मुंबईत  जमावबंदी कशासाठी? जाणून घ्या कलम१४४ म्हणजे काय

त्यानंतर पीडित मुलीच्या आईने कफपरेड पोलिस ठाण्यात अशोक विरोधात ३७६ (२) आय, एन. भा.द.वि कलमांसह ४,८,१०,१२ अंतरर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. पोलिस चौकशीत अशोकने महिन्याभरापूर्वी पीडित मुलीच्या ९ वर्षीय चुलत बहिणीसोबत ही अशा प्रकारे गैरकृत्य केल्याची कबूली दिली आहे. या प्रकरणी पीडित मुलीला वैद्यकिय उपचारासाठी जवळील शासकिय रुग्णालयात दाखल केले असून या प्रकरणात पोलिस अधिक तपास करत असल्याचे डोंगरे यांनी सांगितले. 

पुढील बातमी
इतर बातम्या