Corona virus : मुंबईत जमावबंदी कशासाठी? जाणून घ्या कलम१४४ म्हणजे काय

कोरोनाचा हा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात पहिल्यांदाच १४४ नुसार जमाव बंदीचे आदेश जाहिर

Corona virus : मुंबईत  जमावबंदी कशासाठी? जाणून घ्या कलम१४४ म्हणजे काय
SHARES

मुंबईत कुठल्याही आपत्कालिन परिस्थितीत मुंबई पोलिस हे नेहमीच नागरिकांच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असतात. देशात सध्या कोरोना या संसर्ग रोगाने थैमान घातलेला आहे. मुंबईत अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. कोरोनाचा हा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात पहिल्यांदाच १४४ नुसार जमाव बंदीचे आदेश जाहिर केले आहेत.

कुठल्या परिस्थितीत १४४ लागू करण्यात येते

कलम १४४ हे फौजदारी दंडसंहिता १९७३ मधील असून ते अश्या ठिकाणी लागू केले जाते जिथे सुरक्षेसंबंधात भीती असेल वा दंगलीची संभावना परिस्थिती असल्यानंतर लागू करण्यात येते. यात नमूद अधिकारी फौजदारी दंडसंहिता १९७३ मधील कलम १३४ अन्वये नोटीस पाठवून एखाद्या ठरविक व्यक्तीला काही खास कृती करण्यापासून प्रतिबंध घालण्याचे निर्देश देऊ शकतात. यामध्ये ५ किंवा जास्त लोकांनी एकत्र राहण्यास बंदी असते. यालाच जमावबंदी किंवा curfew असेसुद्धा म्हणतात.

 जमावबंदी कोण लागू करू शकतात ?

जमावबंदीचा आदेश हा जिल्हाधिकारी (collector) / जिल्हा दंडाधिकारी / पोलिस महासंचालक किंवा पोलिस आयुक्त लागू करू शकतात .

 या शिक्षेची तरतूद काय आहे?

कलम १४४ चे उल्लंघन करणार्‍या किंवा या कलमाचे पालन न करणाऱ्या व्यक्तीला पोलिस अटक करू शकतात.   कलम - १०७  किंवा कलम -१५१ अंतर्गत त्या व्यक्तीस अटक केली जाऊ शकते. जे लोक या कलमांचे उल्लंघन करतात किंवा त्यांचे पालन करीत नाहीत त्यांना एक वर्षाची तुरूंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते. हा जामीन पात्र गुन्हा असून आरोपीला न्यायालया मार्फत जामीन मिळू शकतो.

 कलम १४४ किती वेळ घेऊ शकेल ?

कलम -१४४ , २ महिन्यांपेक्षा अधिक काळ लागू करू शकत नाही. मानवी जीवनाचा धोका टाळण्यासाठी किंवा कोणत्याही दंगली टाळण्यासाठी राज्य सरकारला असे वाटत असेल तर त्याचा कालावधी वाढविला जाऊ शकतो.

पहिल्यांदाच संसर्ग रोगासाठी १४४ चा वापर 

गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होत असल्याने नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी म्हणून पोलिसांनी १४४ अंतर्गत जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मोठे समारंभ, गर्दी आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहेत.

सिनेमा, नाट्यगृह, जीम, तरण तलावावर बंदी

मुंबईतील सिनेमागृहे, नाट्यगृहे, जीम आणि तरणतलाव बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कोणत्याही राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी न देण्याचा आणि ज्यांना यापूर्वी परवानगी दिली आहे, त्यांची परवानगी रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

 ट्रॅव्हल कंपन्यांवर निर्बंध; सहली काढण्यास मनाई

राज्यभरात वेगाने फैलावत असलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून खासगी ट्रॅव्हल कंपन्यांवर कडक निबर्ंध लादण्यात आले आहेत. त्यानुसार आता ट्रॅव्हल कंपन्यांना कोणत्याही आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत सहली आयोजित करता येणार नाहीत. मुंबई दर्शन टूर्सही ३१ मार्चपर्यंत थांबवण्यात आले आहेत. या नियमाचे पालन न केल्यास संबंधित कंपन्यांवर कलम १४४ मधील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल, कोणालाही अपवादात्मक परिस्थितीत प्रवास करण्याची गरज भासल्यास मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे.

हेही वाचाः- Coronavirus Updates: कोरोनाविरोधात जनजागृतीसाठी सरसावली गणेश मंडळं

हेही वाचाः- Coronavirus update: राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३३ वर


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा