Advertisement

Coronavirus Updates: कोरोनाविरोधात जनजागृतीसाठी सरसावली गणेश मंडळं

मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळ देखील कोरोनाविरोधात जनजागृती करण्यासाठी सरसावले आहेत.

Coronavirus Updates: कोरोनाविरोधात जनजागृतीसाठी सरसावली गणेश मंडळं
SHARES

कोरोना व्हायरसचा लवकरात लवकर खात्मा करण्यासाठी मुंबई महापालिका अनेक उपाययोजना करत आहे. असातच आता मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळ (Ganesh Mandal) देखील कोरोनाविरोधात जनजागृती करण्यासाठी सरसावले आहेत. महापालिकेच्या (BMC) सहाय्यानं तसंच, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या (Greater Mumbai Public Ganesh Festival Coordinating Committee) आवाहनानंतर मंडळांचे सर्व कार्यकर्ते आपापल्या विभागांमध्ये जनजागृती करत आहेत.

जागोजागी फलक, पत्रकांचं वाटप तसंच, घरोघरी करोनासंबंधित तोंडी माहिती अशी मोहीम सुरू झाली असून, या माध्यमातून महापालिकेला मदतीचा हात मिळाला आहे. करोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर समन्वय समितीतर्फे शुक्रवारी, गणेशोत्सव मंडळांना जनजागृतीसाठी (Awareness) आवाहन करण्यात आलं.

यंत्रणांनंतर सामान्य नागरिकांसोबत गणेशोत्सव मंडळांचा सर्वाधिक जवळचा संबंध पाहायला मिळतो. अशावेळी कठीण प्रसंगात कमी वेळेत जास्तीत जास्त नागरिकांपर्यत पोहोचण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा या मंडळांकडे विश्वासानं पाहत असतात. हीच गोष्ट लक्षात घेत समितीकडून जनजागृतीसाठी आवाहन करण्यात आलं आहे.

मंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या इमारतीतील प्रमुखांमार्फत प्रत्येक घरापर्यंत जागृतीपर माहिती पोहोचेल अशी सोय करण्यात आली आहे. माहिती पत्रकं वाटण्यात आली आहेत. समितीनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार विभागातील प्रत्येक नागरिकांस करोनासंदर्भात माहिती मिळावी यासाठी पत्रकं वाटण्यात आली आहेत. मंडळाच्या अधिकृत सोशल मीडिया (Social Media) खात्यांवरून माहिती दिली जात असून, आरोग्य शिबीर (Health camp) भरवण्याचं नियोजन सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

समितीच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सरकारच्या अधिकृत सूचना मंडळांपर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत. अनेक मंडळांकडून पालिकेच्या विभागस्तरीय अधिकाऱ्यांची मदत घेत जागोजागी करोनासंबंधी माहिती देणारी शिबिरे घेण्यात आली आहेत, असं बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी म्हटलं आहे.हेही वाचा -

Coronavirus Updates: येत्या आठवड्याभरात केईएममध्ये करोना तपासणी प्रयोगशाळा

Coronavirus Updates: प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक वाहनांमध्ये स्वच्छतासंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा