Advertisement

Coronavirus Updates: प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक वाहनांमध्ये स्वच्छता

मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे, बेस्ट, एसटी अशा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांनी स्वच्छतेबाबत उपाययोजना सुरू केल्या आहेत.

Coronavirus Updates: प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक वाहनांमध्ये स्वच्छता
SHARES

कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) पार्श्वभूमीवर राज्यभरातील जनतेमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसनं आणखी जणांना त्याचा संसर्ग होऊ नये यासाठी राज्यभरातील शाळा, कॉलेज, थिएटर्स, पार्क, जलतरणस, जिमखाने बंद ठेणण्यात आले आहेत. तसंच, खबरदारी म्हणून गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आव्हान केलं आहे. त्याचप्रमाणं अनेक मुंबईकर मुंबईतील सार्वजनिक वाहतूकीनं (Public Transport) प्रवास करतात. त्यामुळं अशावेळी हा कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे (Railway), बेस्ट (BEST), एसटी (MSRTC) अशा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांनी स्वच्छतेबाबत उपाययोजना सुरू केल्या आहेत. जंतुनाशक रसायनं वापरून गाड्यांचे खांब, हॅण्डल, आसनं, खिडक्यांची तावदानं इत्यादी गोष्टींचं निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

मुंबईतील लोकलमधून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. अशा परिस्थितीत प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देण्यासाठी लोकलचे दरवाजे, खिडक्यांचे गज-तावदाने, इत्यादी गोष्टी जंतुनाशकांद्वारे स्वच्छ केल्या जात आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्येही जंतुनाशके फवारली जात आहेत. तसंच, मुंबईतील बेस्टच्या (BEST BUS) गाड्याही आगारात पोहोचल्यावर जंतुनाशक रसायने मारून स्वच्छ केल्या जात आहेत.

एसटीनंदेखील खबरदारीच्या उपाययोजना केल्या असून, ‘प्रवाशांनी घाबरून जाऊ नये, परंतु योग्य ती दक्षता घेऊ न प्रवास करावा’, असं आवाहन परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब (Minister of Transport and Chairman of MSRTC Adv. Anil Parab) यांनी केलं आहे. राज्यातील प्रमुख शहरातील गर्दीच्या बसस्थानकांवरील बैठकव्यवस्था दररोज दिवसातून २-३ वेळा सॅनिटायझरचा (Sanitiser) योग्य वापर करून स्वच्छ केली जावी.

बस स्थानकाचा परिसर जंतुनाशकांची फवारणी करून निर्जंतुक केला जावा. वाहकाकडं सॅनिटायजरची बाटली देण्यात यावी. त्यांनी प्रवाशांच्या गरजेनुसार ती उपलब्ध करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.


हेही वाचा -

मुंबईत उकाडा वाढला, कमाल तापमानात वाढ

Coronavirus Updates: रेल्वे कर्मचारी साफ ठेवताहेत लोकल



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा