Advertisement

मुंबईत उकाडा वाढला, कमाल तापमानात वाढ


मुंबईत उकाडा वाढला, कमाल तापमानात वाढ
SHARES

मुंबईसह राज्यभरात उकाडा वाढला असून, मुंबईच्या कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. शनिवारी मुंबईचे किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेले असले, तरी दिवसभरात कमाल तापमानात वाढ झाली होती. त्याशिवाय, रविवारी देखील तापमानात वाढ झाल्यान मुंबईकरांना उकाड्याची जाणीव होऊ लागली आहे.

मुंबईतील तापमानात रविवारपासून वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे आता उकाडा वाढवण्याची शक्यता आहे. गेल्या आठवडाभरात मुंबईचे कमाल तापमान ३० अंशापेक्षा आणि किमान तापमान २० अंशापेक्षा कमी राहिले होते. शनिवारी सांताक्रूझ येथे किमान तापमान १६.६ अंश, पवई १५ आणि पनवेल येथे १४.५ अंश से. नोंदविण्यात आले. मात्र, संध्याकाळी कमाल तापमानात वाढ होऊन सांताक्रूझ येथे पारा ३४.४ अंश सेल्सिअसवर पोहोचला.

तापमानातील वाढ ही यापुढे कायम राहण्याचा अंदाज   हवामान विभागानं वर्तवला आहे. शनिवारी राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान १५ अंशपर्यंत खाली गेले होते. कोकणात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली, तर मध्य महाराष्ट्रात किंचित घट झाली.

राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे ११.६ अंश सेल्सिअस होते. दरम्यान कमाल तापमानात राज्यभरात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा