Advertisement

Coronavirus Updates: रेल्वे कर्मचारी साफ ठेवताहेत लोकल

मुंबई लोकलही स्वच्छ ठेवण्यात येत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई महापालिका उपाययोजना करत आहे.

Coronavirus Updates: रेल्वे कर्मचारी साफ ठेवताहेत लोकल
SHARES
जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. अशातच आता लोकलही स्वच्छ ठेवण्यात येत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई महापालिका उपाययोजना करत आहे. त्याशिवाय, राज्य सरकारने देखील गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन केले आहे. राज्यभरातील थेटर्स, मॉल, नाट्यगृह, जिम, स्विमींग पूल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

मुंबई लोकलमधून प्रवास करताना प्रवाशांना गर्दीचा सामना करावाच लागतो. कोरोना व्हायरस संसर्गजन्य असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने गाडी शेवटच्या स्थानकावर पोहचल्यानंतर रेल्वेचे कर्मचारी सॅनिटाईजरने खिडक्या, दरवाज्याजवळील खांब, हँडल साफ करत आहेत. सोशल मीडियावर रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचे फोटोग्राफ व्हायरल झाले आहेत.

देशभरात सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातही राज्य सरकारतर्फे खबरदारीचा उपाय म्हणून उपाययोजना राबवल्या जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३१ मार्चपर्यंत राज्यातील थेटर्स, मॉल, नाट्यगृह, जिम, स्विमींग पूल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याचसोबत लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं यासाठीही सूचना देण्यात आल्या आहेत.

करोनाच्या प्रादुर्भावानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार सर्वोतोपरीने प्रयत्न करत आहे. अशावेळी आपल्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याची नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. दरम्यान देशभरात आतापर्यंत ८० पेक्षा अधिक लोकांना करोनाची लागण झालेली असून महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, अहमदनगर या शहरात करोनाचे रुग्ण आढळले आहेत.हेही वाचा -

मुंबईत उकाडा वाढला, कमाल तापमानात वाढ

Coronavirus Updates: प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक वाहनांमध्ये स्वच्छताRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा