Advertisement

Coronavirus Updates: येत्या आठवड्याभरात केईएममध्ये करोना तपासणी प्रयोगशाळा

कस्तुरबा रुग्णालयापाठोपाठ केईएम रुग्णालयात येत्या आठवड्याभरात करोना तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहे.

Coronavirus Updates: येत्या आठवड्याभरात केईएममध्ये करोना तपासणी प्रयोगशाळा
SHARES

जगभरात कोरोना व्हायरसमुळं (Corona Virus) मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळं राज्य सरकार (State Government) अनेक उपाययोजना करत आहे. अशातच आता रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत कस्तुरबा रुग्णालयापाठोपाठ केईएम रुग्णालयात (K.E.M. Hospital) येत्या आठवड्याभरात करोना तपासणी प्रयोगशाळा (corona testing laboratory) सुरू करण्यात येणार आहे.

या करोना तपासणी प्रयोगशाळेसाठी (corona testing laboratory) आवश्यक मान्यता घेण्यात आल्या असून प्रयोगशाळेत करोना तपासणीची यंत्रणा उपलब्ध झालेली आहे, अशी माहिती पालिकेच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली. सध्यस्थितीत कस्तुरबा (Kasturba Hospital) मध्यवर्ती प्रयोगशाळेत दिवसभरात सकाळी १० वाजता आणि दुपारी ३ वाजता २ पाळ्यांमध्ये करोनाची तपासणी केली जाते.

एका वेळेस ३३ नमुन्यांची तपासणी करण्याची सुविधा इथं उपलब्ध आहे. यामध्ये घशातील आणि नाकाजवळील नमुने घेतले जातात. जे रुग्ण बाहेरील देशातून प्रवास करून आले आहेत आणि ज्यांना करोनाची लक्षणं आढळून आली आहेत त्यांचीच करोनाची चाचणी केली जाते. याव्यतिरिक्त करोनाबाधित रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या अशा जोखमीच्या गटातील व्यक्तींचीही करोनाची तपासणी केली जाते.

संशयित रुग्णांची संख्या वाढल्यास आणि आवश्यकता भासल्यास ३ पाळ्यांमध्ये तपासणी केली जाणार असल्याची माहिती मिळते. अंधेरीतील सेव्हन हिल्स इथं ३०० खाटांची विलगीकरण सुविधा शनिवारपासून कार्यरत झाली आहे. २ वैद्यकीय अधिकारी आणि २ कर्मचारी असलेले ३ गट या ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहेत. तसंच, रुग्णांसाठी एक रुग्णवाहिकाही उपलब्ध करण्यात आली आहे.

संशयित रुग्णांना किंवा देखरेखीसाठी ठेवण्यात येणारे अलगीकरण (क्वारंटाईन) आणि प्रत्यक्ष करोनाबधित रुग्णांना ठेवण्यात येणारे विलगीकरण कक्ष वेगवेगळे आहेत. दोन्ही प्रकारच्या रुग्णांचा एकमेकांशी संबंध येणार नाही याची काळजी घेतली जाते. त्यामुळं देखरेखीसाठी ठेवण्यात येणाऱ्या रुग्णांनी घाबरू नये. करोनाबाधित रुग्णापासून त्यांना संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली जाते.हेही वाचा -

मुंबईत उकाडा वाढला, कमाल तापमानात वाढ

Coronavirus Updates: प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक वाहनांमध्ये स्वच्छतासंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा