Advertisement

Coronavirus update: राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३७ वर


Coronavirus update: राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३७ वर
SHARES

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची (COVID-19) लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढून ३७ वर पोहोचली आहे. रविवारी औरंगाबाद आणि पुणे इथं कोरोनाचा प्रत्येकी १ नवीन रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची (coronavirus) संख्या वाढून ३३ वर गेली आहे. तर, रविवारी ९५ संशयित रुग्णांना राज्यातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र आता महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून संख्या ३७वर गेली आहे.

हेही वाचा- Corona Virus :कोरोनाच्या धास्तीने पोलिसही अलर्ट, ‘मास्क’ लावूनच करणार ड्युटी

कोरोना बाधितांची संख्या:

  • पुणे - 16
  • मुंबई - 8
  • नागपूर - 4
  • यवतमाळ - 2
  • नवी मुंबई - 3
  • ठाणे - 1
  • कल्याण - 1
  • अहमदनगर - 1
  • औरंगाबाद - 1

आणखी पाॅझिटिव्ह रुग्ण

शनिवारी रात्री पिंपरी चिंचवड इथं ५ आणि रविवारी सकाळी औरंगाबाद तसंच पुणे इथं प्रत्येकी १ कोरोनाग्रस्त रुग्ण (corona patient) आढळून आल्यानंतर राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ३३ झाली. औरंगाबाद येथील एक ५९ वर्षीय महिला रशिया आणि कझाकिस्तानला जाऊन आली होती. तिचा वैद्यकीय चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला, जपानला जाऊन आलेल्या पिंपरी- चिंचवड भागातील एका व्यक्तीचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला. या रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.    

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून राज्यभरातील शाळा, काॅलेजांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून मॉल्स, नाट्यगृहं, व्यायामशाळा, जलतरण तलावही ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. 

मुंबईत कलम १४४

खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत (mumbai) जमावबंदीचं कलम १४४ (section 144) लागू करण्यात आलं आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून लग्न समारंभ, पार्टी, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना मनाई करण्यात आली असून अनावश्यक गर्दी टाळण्याचं मुंबई पोलिसांकडून आवाहन करण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांकडून खासगी ट्रॅव्हल कंपन्यांवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यानुसार आता ट्रॅव्हल कंपन्यांना कोणत्याही आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत सहली आयोजित करता येणार नाहीत. या नियमाचं पालन न केल्यास संबंधित कंपन्यांवर कलम १४४ मधील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल, असं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. 

हेही वाचा- Corona Virus : मुंबई पोलिसांकडून ट्रॅव्हल कंपन्यांवर निर्बंध; सहली काढण्यास मनाई

देशात महाराष्ट्रात सर्वाधिक ३३ जणांना करोनाची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्याशी रविवारी फोनवरून १५ मिनिटे चर्चा केली. करोनाचा मुकाबला करण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहाय्य करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची पंतप्रधानांना माहिती दिली.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा