Corona Virus : मुंबई पोलिसांकडून ट्रॅव्हल कंपन्यांवर निर्बंध; सहली काढण्यास मनाई

कोणालाही अपवादात्मक परिस्थितीत प्रवास करण्याची गरज भासल्यास मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाची परवानगी घ्यावी लागणार

Corona Virus : मुंबई पोलिसांकडून ट्रॅव्हल कंपन्यांवर निर्बंध; सहली काढण्यास मनाई
SHARES

राज्यभरात वेगाने फैलावत असलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून खासगी ट्रॅव्हल कंपन्यांवर कडक निबर्ंध लादण्यात आले आहेत. त्यानुसार आता ट्रॅव्हल कंपन्यांना कोणत्याही आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत सहली आयोजित करता येणार नाहीत. या नियमाचे पालन न केल्यास संबंधित कंपन्यांवर कलम १४४ मधील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल, असे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ३१ मार्चपयर्ंत हे निबर्ंध कायम राहणार आहेत. कोरोना व्हायरस फैलाव होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. कोणालाही अपवादात्मक परिस्थितीत प्रवास करण्याची गरज भासल्यास मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे.

हेही वाचाः- Corona virus : कोरोनामुळे आरटीई सोडत व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे


गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि मॉल्स बंद ठेवण्याचा आदेश सरकारकडून देण्यात आला होता. मात्र, काही मल्टिप्लेक्स चालकांनी लेखी आदेश आला नसल्याचे सांगत चित्रपटगृहे सुरुच ठेवली होती. त्यामुळे सरकारी आदेशाच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबई, ठाणे, डोंबिवलीत गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात येणार्‍या शोभायात्रा रद्द करण्यात आल्या होत्या.

हेही वाचाः- Corona virus : मुंबईत जमावबंदीचा आदेश लागू

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरला लागू करण्यात आलेले निबर्ंध आता संपूर्ण राज्याला लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात ३१ मार्चपयर्ंत नाट्यगृहे, सिनेमागृहे, जलतरण तलाव आणि व्यायामशाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकार्‍यांना पत्रक पाठवून तसे आदेशच दिले आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा