Corona virus : मुंबईत जमावबंदीचा आदेश लागू

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मोठे समारंभ, गर्दी आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. तसेच पाच पेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमू नये,

Corona virus : मुंबईत जमावबंदीचा आदेश लागू
SHARES

 मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने मुंबई पोलिसांनीही महत्त्वाची पावले उचलली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी आज मुंबईत जमावबंदी आदेश लागू केले आहे. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होत असल्याने नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी म्हणून पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचाः- Coronavirus : हिंदुजा रुग्णालयातील डॉक्टर- नर्सेसच्या चाचण्या निगेटिव्ह

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मोठे समारंभ, गर्दी आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. तसेच पाच पेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमू नये, असं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख हे गृहखात्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबईत कोरोनाचे पाच रुग्ण आढळल्याने राज्यसरकारने मुंबईतील सिनेमागृहे, नाट्यगृहे, जीम आणि तरणतलाव बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कोणत्याही राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी न देण्याचा आणि ज्यांना यापूर्वी परवानगी दिली आहे, त्यांची परवानगी रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच मॉल आणि गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आणि विनाकारण प्रवास करणे टाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी जमावबंदी लागू केल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचाः- मुंबईत उकाडा वाढला, कमाल तापमानात वाढ

सध्या मुंबईत अधिवशेन असल्यामुळे आपल्या व्यथा, प्रश्न मांडण्यासाठी लोकप्रतिनिधीकडे गाऱ्हाने घेऊन येतात. तर काही जण न्याय मिळावा यासाठी आझाद मैदानात आंदोलनाला बसतात. मात्र सध्या देशभऱात कोरोना या संसर्ग जन्य रोगाचे सावट आहे. भारतात ही आता या रोगाचे परिणाम दिसू लागताच. राज्य सरकारने गर्दीच्या ठिकाणांवर निर्बंध आणण्यास सुरूवात केली. आझाद मैदान ही नागिरक आंदोलनासाठी मोठ्या संख्येने जमतात. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आता पोलिसांनी आझाद मैदानात आंदोलकांना परवानगी देणे थांबवले आहे. मागील तीन दिवसात पोलिसांनी ३४ आंदोलन रद्द केलयाची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.  

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा