आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी २ हजार ९९२ पालकांनी आपल्या पाल्यांचे ऑनलाईन अर्ज सादर केले होते. या पालकांना सोडतीची प्रतीक्षा लागली होती. कोरोना विषाणूच्या प्रादृभार्वामुळे ही सोडत व्हिडीओ कॉन्फरन्स व्दारे मंगळवार १७ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत काढण्यात येणार आहे.
हेही वाचाः- मुंबईत उकाडा वाढला, कमाल तापमानात वाढ
कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे आरटीई २५ टक्के प्रवेशाची लॉटरी प्रक्रीया ही नेहमी प्रमाणे हॉलमध्ये आयोजीत न करता व्हिडीओ कॉन्फरन्स व्दारे काढण्यात येणार आहे. तरी शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद यांनी व्हीडीओ कॉन्फरन्स करीता उपस्थित रहावे तसेच नॉव्हेल कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता पडताळणी समितीकडे पालकांनी गर्दी करू नये असे शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांनी कळविले आहे. राज्यस्तरावर यंदा प्रवेशासाठी एकच सोडत जाहीर केली जाणार आहे. प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी पात्र ठरल्यास त्यांची टप्या, टप्याने प्रतीक्षायादी लावली जाणार आहे. जागा रिक्त होताच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली जाईल. जागा रिक्त होत असेल तर त्याची सूचना पालकांना एसएमएसच्या माध्यमातून दिली जाणार आहे . पालकांनी फक्त एसएमएसवर अवलंबून राहू नये.
हेही वाचाः- Coronavirus : हिंदुजा रुग्णालयातील डॉक्टर- नर्सेसच्या चाचण्या निगेटिव्ह
आरटीई पोर्टलवर अ?ॅप्लीकेशन वाईसवर डेटा क्लीक करून आपला अर्ज क्रमांक टावूष्ठन लॉटरी लागली अथवा नाही ते पहावे. आरटीई प्रवेशासाठी यंदा जिल्ह्यात १६३ शाळांनी नोंदणी केली जिल्ह्यातील १ हजार ३६३ जागा आरक्षित ठेवण्यात आल्या त्यासाठी २ हजार ९९२ पालकांनी अर्ज सादर केले. कागदपत्राची पुर्तता न केल्यास प्रवेश रद्द लॉटरी जाहीर झाल्या नंतर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना रहिवासी पुरावा, जन्माचा पुरावा, प्रवर्गात असल्यास जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, अनाथ बालकांसाठी सांभाळ करीत असलेल्या पालकांचे हमीपत्र आदी कागदपत्रांची पूर्तता पडताळणी समितीकडे करणे गरजेचे आहे. कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास प्रवेश रद्द होऊ शकतो.