Corona virus :कोरोनाच्या धास्तीने पोलिस ही अलर्ट, ‘मास्क’ लावूनच करणार ड्युटी

पोलिसांनी जनतेशी संवाद साधतांना टाळाव्यात नागरिकांशी गरजेपुरतेच बोलावे आणि जशी काळजी घेतली पाहिजे तशी काळजी घेऊनच संवाद ठेवावा

Corona virus  :कोरोनाच्या धास्तीने पोलिस ही अलर्ट, ‘मास्क’ लावूनच करणार ड्युटी
SHARES

कोरोनाचा प्रादुर्भाव देशभरामध्ये हळूहळू वाढताना दिसतोय त्यादृष्टीनं सरकारी यंत्रणा मोठ्या प्रमाणामध्ये कामाला लागलेल्या आहेत मात्र हे सगळं करत असताना सगळ्यात जास्त ताण येतो तो म्हणजे पोलिसांवरती पोलिसांना वारंवार नागरिकांच्या संपर्कात राहावं लागतं नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांना नेहमीच तत्पर असावे लागते. मात्र हे सगळं करत असताना त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा असतो. हीच बाब लक्षात घेता मुंबई पोलिसांनी सुद्धा कोरोना व्हायरसबाबत काळजी घेण्यास सुरुवात केलेली आहे.

हेही वाचाः- Corona Virus : मुंबई पोलिसांकडून ट्रॅव्हल कंपन्यांवर निर्बंध; सहली काढण्यास मनाई

मुंबई पोलीस दलात एकूण ९४ पोलीस ठाण्यांच्या सर्व स्टाफ मध्ये पोलिस आयुक्त कार्यालयाकडून मास्कचे वाटप करण्यात आलेले आहे. कोरोना व्हायरसचे संक्रमण होण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या सगळ्या पद्धती पोलिसांनी जनतेशी संवाद साधतांना टाळाव्यात नागरिकांशी गरजेपुरतेच बोलावे आणि जशी काळजी घेतली पाहिजे तशी काळजी घेऊनच संवाद ठेवावा अशा पद्धतीचे हे निर्देश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. दरम्यान नागरिकांनी सुद्धा या आजारापासून बचाव करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावे असं आयुक्तांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर या आजारात संबंधित सोशल मीडियावर जो कुणी अफवा पसरवत आहेत, त्याच्यावर सुद्धा कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. असं मुंबई पोलीस पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचाः- Coronavirus Updates: कोरोनाविरोधात जनजागृतीसाठी सरसावली गणेश मंडळं

दरम्यान बंदोबस्तावर असणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना मास्कसुद्धा वाटप करण्यात आले आहेत. पोलिस आयुक्तालयातून परिमंडळातील पोलिस ठाण्याच्या गरजेनुसार २००० ते ३००० मास्कचे वाटप करण्यात आले आहे. ड्युटीवर नागरिकांच्या गर्दीत वावरणारे, पोलिस ठाण्यात नागरिकांशी संवाद साधणारे, वाहतूक पोलिस, बिट मार्शल, गस्तीवरील पोलिसांना मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले आहे.त्यामुळे बंदोबस्तावरती असणारे सर्व कर्मचारी हे मास्क लावूनच बंदोबस्तावर तैनात असताना पाहायला मिळत आहेत. कोरोना व्हायरसला लढा देण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत. तरीसुद्धा या आजाराशी दोन हात करण्यासाठी स्वतः सुद्धा योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. नागरिकांनी गरजेनुसार पोलिसांना सहकार्य करावे असं सुध्दा मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा