राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जैयस्वाल यांनी CISF च्या महासंचालकपदी नियुक्त

राज्यात लवकरच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. नुकतीच राज्याचे  पोलीस महासंचालक सुबोध जैयस्वाल यांची CISF च्या महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे जैयस्वाल आता केंद्रीय सेवेत जाणार आहेत. जैस्वाल यांनी यांसंदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे विनंती केली होती, ती विनंती मान्य करण्यात आली आहे. मात्र आता राज्याच्या पोलिस महासंचालकपदी कुणाची वर्णी लागते हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे.

हेही वाचाः- आयटी रिटर्न भरण्याची मुदत आणखी वाढवली, 'ही' आहे अंतिम तारीख

सुबोध जयस्वाल यांनी केंद्रीय सेवेत जाण्यासाठी अर्ज केला होता. आता राज्याचे नवे पोलीस महासंचालक कोण होणार याची चर्चा रंगली आहे. सुबोध जयस्वाल हे १९८५ बॅचचे IPS अधिकारी आहेत. तीन वर्षांपूर्वी ते मुंबईचे पोलीस आयुक्त होते. त्यानंतर त्यांना बढती मिळाली आणि ते राज्याचे पोलीस महासंचालक झाले. सरकार आणि सुबोध जैस्वाल यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता. गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या बदल्या झाल्या होत्या. त्या बदल्या मी होऊ देणार नसल्याचा त्यांनी पवित्रा घेतला होता. राज्य सरकारबरोबर पटत नसल्यानं पुन्हा एकदा त्यांनी केंद्रात जाण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान सुबोध जैस्वाल यांची सीआयएसएफ महासंचालकपदाचा कार्यकाळ हा नियुक्तीपासून ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत असणार आहे.

हेही वाचाः- मध्य रेल्वे मार्गावर 'चिखलोली' नवा थांबा

सुबोध जयस्वाल यांची केंद्रात नियुक्तीनंतर आता बिपीन बिहारी, संजय पांडे, हेमंत नगराळे, परमबिर सिंह यांची नावे नव्या पोलीस महासंचालकांच्या पदाच्या शर्यतीत आहेत. सुबोध जैस्वाल हे केंद्र सरकारमध्ये होते, त्यानंतर ते मुंबईत आले.

पुढील बातमी
इतर बातम्या