Advertisement

आयटी रिटर्न भरण्याची मुदत आणखी वाढवली, 'ही' आहे अंतिम तारीख

कोरोनामुळे यंदा केंद्र सरकारने आयटी रिटर्न भरण्यासाठी दोन वेळा मुदतवाढ दिली. दरवर्षी ३१ जुलैपर्यंत आयकर विवरण सादर करण्याची मुदत असते.

आयटी रिटर्न भरण्याची मुदत आणखी वाढवली, 'ही' आहे अंतिम तारीख
SHARES

केंद्र सरकारने इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरण्याची मुदत १० दिवस वाढवली आहे. करदात्यांना आता १० जानेवारीपर्यंत आयटी रिटर्न भरता येणार आहे.

कोरोनामुळे यंदा केंद्र सरकारने आयटी रिटर्न भरण्यासाठी दोन वेळा मुदतवाढ दिली. दरवर्षी ३१ जुलैपर्यंत आयकर विवरण सादर करण्याची मुदत असते. ३१ जुलैनंतर ३० नोव्हेंबर ही अंतिम मुदत होती.ही मुदत आणखी वाढवून ३१ डिसेंबर केली होती. मात्र. तरीही बहुतांश करदात्यांना विवरण पत्र सादर करण्यात अडचणी येत होत्या. करदात्यांकडून मुदतवाढीची मागणी करण्यात येत होती.

त्यामुळे बुधवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत १० जानेवारीपर्यंत आयटी रिटर्न भरण्याची मुदत देण्यात आली आहे. त्याशिवाय जीएसटीचा वार्षिक रिटर्न भरण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अंतिम मुदतीपर्यंत रिटर्न भरले नाही करदात्यांना विलंब शुल्क भरावे लागणार आहे. किमान १ हजार ते जास्तीत जास्त १० हजार रुपये दंड आकारला जाईल.

आयकर विभागाच्या माहितीनुसार, बुधवारी देशभरातून ८ लाख ९६ हजार करदात्यांनी आयटीआर रिटर्न फाईल केला आहे. शेवटच्या दिवसापर्यंत वाट न पाहता करदात्यांनी आयटीआर रिटर्न लवकरात लवकर भरावा, असं आवाहन आयकर विभागाने केलं आहे.



हेही वाचा -

मुंबईच्या वेशीवर दोन महिन्यांनंतर फास्टॅग बंधनकारक

फायर बाईकसाठी पालिकेची निविदा, निमुळत्या जागेसाठी सोईस्कर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा