पोलिसांनी पण संयम पाळायला हवा, ठाण्यात पत्रकाराला तर वसईत नर्सला मारहाण

आवाहन करून सुद्धा रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी खाकीचा दाखवण्यास सुरूवात केली. मात्र कारवाई करताना पोलिसांनी ही जरा भान ठेवलं पाहिजे. ठाण्यात पोलिसांनी थेट पत्रकार, नर्स यांनाच मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या या वागणूकीमुळे सध्या सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. 

कोरोनामुळे राज्यात संचारबंदी असताना पोलिसांकडून सर्वसामान्यांना मारहाण होत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. अनावश्यक रस्त्यावर फिरणार्यांना पोलिस त्यांच्या काठीने मारहाण करत आहे. ठाणे ग्रामीण येथे एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीचा रिपोर्टर उत्कर्ष चतुर्वेदी हा वार्तांकन करत असताना, पोलिसांनी त्याला हटकले. तो वारंवार पोलिसांना आपण पत्रकार असल्याचे सांगत असताना ही पोलिसांनी त्याचं एक न एकता. सरळ त्याच्यावर काठी उगारली. पोलिसांच्या मारहाणीत उत्कर्ष गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती कळाल्यानंतर पत्रकारांनी हा मुद्दा उचलून धरत, गृहमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे.  या घटनेचे माहिती सोशल मिडियावर पोस्टकेल्यानंतर पोलिसांच्या या कारवाईवर अनेक तिखट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. 

हेही वाचाः-राणेंनी मागितली संजय राऊतांची माफी? ते ट्विट कुणाचं??

मात्र पोलिसांची ही काही पहिली वेळ नाही. वसईत प्रियांका राठोड या नर्स असून कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्याची ड्युटी लावण्यात आली आहे. त्या कामावर जात असताना तिच्या पोलिसांनी लाठीचार्ज केला. या हल्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तिच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका मागोमाग एक अशा घटना पुढे येऊ लागल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.  सरकारकडून या पूर्वीच पालिका, आरोग्य सेवा, पत्रकार, डाॅक्टर, नर्स अशा अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना संचार बंदीच्या आदेशातून वगळण्यात आले आहे. मात्र तरी ही पोलिसांकडून खात्री न करताच बळाचा वापर केला जात असल्याचे दिसून आले आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या