Advertisement

राणेंनी मागितली संजय राऊतांची माफी? ते ट्विट कुणाचं??

हे त्यांचं अधिकृत ट्विटर हँडल नाही. असं असलं तरी, या ट्विटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.

राणेंनी मागितली संजय राऊतांची माफी? ते ट्विट कुणाचं??
SHARES

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून  भाजपची झाडाझडती घेण्याचा नित्यक्रम सुरु ठेवलेला असतानाच, भाजपवासी झालेले माजी खासदार निलेश राणे यांनीही राऊतांवर एकेरी भाषेत ‘ट्वीटहल्ला’ करण्याची सवय सोडलेली नाही. निलेश राणेंनी काही दिवसांपूर्वी राऊतांवर खालच्या भाषेतील ट्विट केल्यामुळे दिलगिरी व्यक्त करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी संजय राऊतांची  सोशल मीडियावर माफी मागितल्याचं दिसत आहे. मात्र ज्या हँडलवरुन हा माफीचा मेसेज टाकण्यात आला आहे ते राणे यांचं अधिकृत ट्विटर हँडल नाही. असं असलं तरी, या ट्विटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा हार्मोनियम वाजवतानाचा एक व्हिडिओ एका वरिष्ठ पत्रकाराने सोशल मीडियावर टाकला होता. हा व्हिडिओ संजय राऊत यांनी २५ मार्च २०२० रोजी रिट्विट केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरलही झाला. त्या व्हिडिओला टॅग करत, माजी खासदार निलेश राणे यांनी संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत एक ट्विट केलं आहे. ‘ आईशपथ मला डाऊट होता संज्याला मी चर्चगेट स्टेशन प्लॅटफाॅर्मवर पेटी वाजवताना  फाटक्या कपड्यात बघितलं होतं. आज खात्री झाली”असं ट्विट निलेश राणे यांनी केलं.

निलेश राणे यांच्या ट्विटला अनुसरूनच नारायण राणे नावाच्या ट्विटर हँडलवरून  ‘पोरगं वाया गेलं आहे, त्याच्यावतीने मी माफी मागतो…” असं ट्विट  संजय राऊतांना टॅग करून करण्यात आलं आहे. मात्र हे ट्विटर हँडल खासदार नारायण राणे यांचं नसल्याचं कळतं. कुणीतरी खोडसाळ वृत्तीने हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे.  मात्र या ट्विटची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.  

हेही वाचाः- अन्न व औषध प्रशासन विभागकडून विशेष नियंत्रण कक्षाची स्थापना

भाजपा नेते नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात किती वाद आहेत हे सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र त्यांचेअनेक नेत्यांशी वैयक्तिक संबंध खूप चांगले आहेत. काही दिवसांपूर्वीच राज्यसभेत एकाच बाकावर नारायण राणे, अरविंद सावंत, सुनिल तटकरे, संजय राऊत आणि सुप्रिया सुळे ‘चाय पे चर्चा’ करताना दिसले होते. 

 हेही वाचाः- लोकांना देणार धान्याऐवजी थेट पीठ, महसूलमंत्र्यांची माहिती

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा