Advertisement

अन्न व औषध प्रशासन विभागकडून विशेष नियंत्रण कक्षाची स्थापना

काही अडचणी आल्यास नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र. १८००२२२३६५ ०२२-२६५९२३६२/६३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

अन्न व औषध प्रशासन विभागकडून विशेष नियंत्रण कक्षाची स्थापना
SHARES

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्‌भवलेली स्थिती लक्षात घेता औषध वितरण नियमित ठेवणे आणि उत्पादन सुरळीत ठेवण्यात येणाऱ्या अडचणींच्या निराकरणासाठी अन्न व औषध प्रशासनाने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. हा नियंत्रण कक्ष अन्न व औषध प्रशासनाच्या मुख्यालयात श्री. सुनील भारद्वाज, पोलिस अधीक्षक तथा सह आयुक्त (दक्षता) यांच्या नियंत्रणात सुरु राहणार आहे.

हेही वाचाः- अत्यावश्यक वाहने अडवल्यास, वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनवर संपर्क साधा

सध्या जगात, देशात, राज्यात कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावामुळे भयावह स्थिती निर्माण झालेली आहे. या परिस्थितीत जनतेला सर्व आवश्यक औषधे नियमित उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. औषध वितरण व उत्पादन हे अत्यावश्यक सेवेमध्ये मोडले जाते. मात्र औषध वितरण नियमित ठेवणे व औषध उत्पादन सुरळीत सुरु ठेवणे यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणींचे तत्परतेने निराकरणासाठी संबंधितांनी काही अडचणी आल्यास नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र. १८००२२२३६५ ०२२-२६५९२३६२/६३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

हेही वाचाः- टोलनाक्यांवरील टोलवसुलीला स्थगिती, नितीन गडकरींचा मोठा निर्णय

पंतप्रधानानी घोषीत केलेल्या लाॅकडाऊनमुळे शहरात गोंधळाचे वातावरण होते. मात्र वेळीच राज्य सरकारने पोलीस दलाला सुचना केल्याने, जीवनावश्यक वस्तुंच्या ने-आण तसेच खरेदी-विक्री संदर्भात सुट देण्यात आली. त्याचप्रमाणे, जिवनावश्यक वस्तुंची ने-आन अथवा ज्या कायर्यालयीन कर्मचाऱयांना ड्युटीवर येण्यास सांगितले आहे. अशा नागरीकाबा रस्त्यावर देखील काही समस्या आल्यास यांच्यासाठी वाहतुक पोलिसांनी कोरोना ट्रॅफीक हेल्पलाईन सेवा सुरु करण्यात आली आहे.

या हेल्पलाईनवर करा संपर्क

२४९३७७४७ / २४९३७७५५

 

 

 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा