Coronavirus cases in Maharashtra: 235Mumbai: 93Pune: 32Islampur Sangli: 25Nagpur: 16Pimpri Chinchwad: 12Kalyan: 6Ahmednagar: 5Thane: 5Navi Mumbai: 4Yavatmal: 4Vasai-Virar: 4Buldhana: 3Satara: 2Panvel: 2Kolhapur: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 10Total Discharged: 39BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

टोलनाक्यांवरील टोलवसुलीला स्थगिती, नितीन गडकरींचा मोठा निर्णय

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर आधीच सर्व बंद केले असताना. नागरिकांपर्यंत अत्यावश्यक सेवा जलद गतीने पोहचणे गरजेचे आहे

टोलनाक्यांवरील टोलवसुलीला स्थगिती, नितीन गडकरींचा मोठा निर्णय
SHARE

 जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. भारतामध्येही कोरोना रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहेत. येत्या १४ एप्रिलपर्यंत अवघा भारत देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. अत्यावश्यक सुविधा वगळता इतर सर्व बंद करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे आता देशभरात टोलवसुलीला तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती देण्यात आली आहे. केंद्रीय दळणवळण आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर आधीच सर्व बंद केले असताना. नागरिकांपर्यंत अत्यावश्यक सेवा जलद गतीने पोहचणे गरजेचे आहे. आठवड्याभरापासून बंदच्या काळात अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या गाड्यांची संख्या कमी झाली आहे. ही सेवा नित्य नियमाने सुरू रहावी, तसेच या अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना पोलिसांनी कुठे ही रोखू नये. त्यांच्यावर कुठलिही कारवाई होऊ नये, या करता विशेष पास देण्यात आले आहे. 


लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर वाहनांची संख्या कमी झाली आहे. जिल्हा आणि राज्यपातळीवरील सीमा या देखील बंद केल्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता. इतर कुठलिही वाहने महामार्गांवर नाहीत. ही वाहने वेळेत जावीत. त्या पार्श्वभूमिवर  टोलनाक्यांवर कोणत्याही स्वरूपाचा टोल वसूली केली जाणार नाही. मोदींनी जाहीर केलेल्या १४ एप्रिलपर्यंत भारतात कोणत्याही टोलनाक्यावर टोलवसुली केली जाणार नाही. असे नितीन गडकरींनी स्पष्ट केलं आहे. अत्यावश्य सेवा पुरवणाऱ्या वाहनांना कोणत्याही प्रकारचा विलंब होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

 हेही वाचाः- Coronavirus Updates: १४ एप्रिलपर्यंत लोकल बंद

 हेही वाचाः- Coronavirus Updates: 'त्या' देवदूतांच्या मदतीला धावला 'सिद्धिविनायक'


संबंधित विषय
ताज्या बातम्या