Coronavirus cases in Maharashtra: 230Mumbai: 92Pune: 30Islampur Sangli: 25Nagpur: 16Pimpri Chinchwad: 12Kalyan: 6Ahmednagar: 5Thane: 5Navi Mumbai: 4Yavatmal: 4Vasai-Virar: 4Satara: 2Panvel: 2Kolhapur: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Buldhana: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 10Total Discharged: 39BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

Coronavirus Updates: 'त्या' देवदूतांच्या मदतीला धावला 'सिद्धिविनायक'

सिद्धिविनायक ट्रस्टतर्फे काल मुंबईतील पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणाचे व पाण्याचे वाटप करण्यात आले.

Coronavirus Updates: 'त्या' देवदूतांच्या मदतीला धावला 'सिद्धिविनायक'
SHARE

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सामान्यांना घरातून बाहेर पडण्यास मज्जाव आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना घराबाहेर फिरण्याची मुभा आहे. त्यामुळं देशभरात लॉकडाऊन असताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मात्र अहोरात्र सेवा बजावत आहेत. या कर्मचाऱ्यांसाठी मुंबईतील सिद्धिविनयाक धावला आहे.

सिद्धिविनायक ट्रस्टतर्फे काल मुंबईतील पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणाचे व पाण्याचे वाटप करण्यात आले. देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी देवदूतच ठरले आहेत. देशभरात लॉकडाऊन असला तरी जीवनावश्यक सेवा सुरू आहेत. या सेवा देणारे कर्मचारी आपल्या कुटुंबापासून दूर राहून कर्तव्य पार पाडत आहेत. यामध्ये पोलीस, महापालिका कर्मचारी व वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

कठीण काळात देवदूत बनून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना अनेक संस्था आपापल्या परीनं मदत करत आहेत. सामाजिक कामांमध्ये नेहमीच खारीचा वाटा उचलणाऱ्या मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्टनं देखील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना जेवण पुरवणं सुरू केलं आहे. बुधवारी वाहतूक पोलिसांना व अन्य कर्मचाऱ्यांना ट्रस्टच्या वतीनं जेवण व पाण्याची सोय करून देण्यात आली.

जगभरात आतापर्यंत २१ हजारांवर लोकांचे बळी घेणाऱ्या या विषाणूनं भारतात, विशेषत: महाराष्ट्रात थैमान घातलं आहे. देशात करोनाबाधितांची संख्या ६००च्या वर पोहोचली आहे. तर, महाराष्ट्रात हा आकडा १२४ झाला आहे. हेही वाचा -

Coronavirus Updates: १४ एप्रिलपर्यंत लोकल बंद

Coronavirus Updates: प्रभादेवीत 'त्या' महिलेला करोनाची लागणसंबंधित विषय
ताज्या बातम्या