Advertisement

Coronavirus Updates: प्रभादेवीत 'त्या' महिलेला करोनाची लागण

मुंबईच्या प्रभादेवी परिसरातही एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

Coronavirus Updates: प्रभादेवीत 'त्या' महिलेला करोनाची लागण
SHARES

मुंबईसह महाराष्ट्रात करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्येत दररोज वाढ होत आहे. मुंबईच्या प्रभादेवी परिसरातही एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. या महिलेचा Covid-19 चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रभादेवी परिसरात कॉर्पोरेट कार्यालयाजवळ या महिलेचा भोजन विक्रीचा व्यवसाय आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधून कस्तुरबा रुग्णालयात चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे. मुंबई महापालिकेकडून ही माहिती देण्यात आली. या महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या Covid-19 चाचणीच्या अहवालाची प्रतिक्षा आहे अशी माहिती मिळते.

या भागात राहणाऱ्या एका तरुणाचा मंगळवारी करोना व्हायरस चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळं मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांती संख्या हळूहळू वाढत असून, अनेकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना करत आहे. नागरिकांना सतत सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे. परंतु, नागरिकांकडून याला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. मुंबईसह राज्यात संचारबंदी असताना देखील नागरिक घराबाहेर पडत आहेत. आपल्या आरोग्याची परिक्षा घेत असून, इतरांनाही धोका निर्माण करत आहेत. हेही वाचा - 

हातावर पोट असणाऱ्यांना 'Parle G'चा आधार

पुन्हा एकदा हसवण्यास तयार फुकरे टिमRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement