Advertisement

हातावर पोट असणाऱ्यांना 'Parle G'चा आधार

पार्ले कंपनीनं रोजनदारीवर काम करमाऱ्या कामगारांना मदतीचा हात दिला आहे. पार्ले बिस्कीट हे गरीबांचं खाद्य समजलं जातं.

हातावर पोट असणाऱ्यांना 'Parle G'चा आधार
SHARES

देशभर २१ दिवसांच्या लॉकडाउनला बुधवारपासून सुरुवात झालीय. या काळात सर्वाधिक हाल हे हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे होत आहेत. सकाळी कमवायचं आणी रात्री खायचं अशी उपजिविका करणाऱ्यांनी आता करायचं काय असा प्रश्न निर्माण झालाय. अशा गरीब लोकांसाठी मदतीचं आवाहनही करण्यात येत आहे. त्या आवाहनाला पार्ले कंपनीनं प्रतिसाद दिला आहे. कंपनी ही पुढच्या तीन आढवड्यात तब्बल 3 कोटी बिस्किट पॉकेट्सचं वाटप करणार आहे.

पार्ले कंपनीनं रोजनदारीवर काम करमाऱ्या कामगारांना मदतीचा हात दिला आहे. पार्ले बिस्कीट हे गरीबांचं खाद्य समजलं जातं. त्यानुसार दर आठवड्यात 1 कोटी अशा प्रकारे तीन आठवड्यात 3 कोटी पॅकेट्स देणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. सरकारच्या मदतीनं गरजू लोकांना याचं वाटप करण्यात येणार आहे.

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स उद्योग समुहाने 2 आठवड्यांत १०० बेडची क्षमता असलेलं देशातील पहिलं कोरोना समर्पित रुग्णालय उभारलं आहे. सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनने मुंबई महापालिकेच्या मदतीने मुंबईच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात १०० बेडची क्षमता असलेलं केंद्र सुरू केलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर इथे उपचार केले जाणार आहेत. कंपनीने पत्रकाद्वारे याची माहिती दिली आहे.

देशातील हे कोरोना समर्पित पहिलं केंद्र आहे. याचा सर्व खर्च रिलायन्सकडून केला जाणार आहे. या केंद्रावर निगेटिव्ह प्रेशर रुम तयार करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे करोनाचा संसर्ग होणार नाही आणि बाधितांची संख्या रोखण्यास मदत होईल. सर्व बेड हे आवश्यक साहित्यांसह उपलब्ध आहेत. व्हेंटिलेटर्स, पेसमेकर्स, डायलॅसिस मशिन आणि पेशंट मॉनिटरिंग साहित्यही उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.हेही वाचा

कोरोनासंदर्भातील माहितीसाठी ‘या’ व्हाॅट्सअॅप हेल्पलाईनवर संपर्क साधा!

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा