Advertisement

पुन्हा एकदा हसवण्यास तयार फुकरे टिम

‘फुकरे 3’ची स्क्रिप्टवर काम चालू आहे. निर्मात्यांनी सर्व मुख्य कलाकारांना त्यांच्या तारखा ब्लॉक करण्यास सांगितलं आहे.

पुन्हा एकदा हसवण्यास तयार फुकरे टिम
SHARES

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या सगळीकडे चिंता आणि भितीचं वातावरण आहे. अशा वातावरणात तुमच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी फुकरे चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रयत्न केला आहे. होय, तुमचा अंदाज अगदी योग्य आहे. ‘फुकरे 3’ची तयारी जोरात सुरू आहे. हा चित्रपट २०१३ मधील फुकरे या चित्रपटाचा सिक्वेल असेल.

बातमीनुसार, ‘फुकरे 3’ची स्क्रिप्टवर काम चालू आहे. निर्मात्यांनी सर्व मुख्य कलाकारांना त्यांच्या तारखा ब्लॉक करण्यास सांगितलं आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी त्यांच्या प्रॉडक्शन हाऊस एक्सेल एंटरटेनमेंट अंतर्गत ‘फुकरे 3’ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या स्टारकास्टला या वर्षाच्या ऑक्टोबरच्या तारखा बुक करण्यास सांगितल्या आहेत. फुकरे फ्रेंचायझी फुकरे रिटर्न्सनं २०१७ मध्ये प्रदर्शित झाली होती. ‘फुकरे’ सारखाचा ‘फुकरे २’ देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

या दोन्ही चित्रपटांमध्ये पुलकित सम्राट, अली फजल, रीचा चढा, वरुण शर्मा आणि मनजोत सिंह मुख्य भूमिकेत होते. हे दोन्ही चित्रपट मृगदीपसिंग लामा यांनी दिग्दर्शित केले होते. तसंच या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांना हसवण्याचं काम चांगल्याप्रकारे केलं होतं. आता अशी अपेक्षा आहे की ‘फुकरे 3’ देखील प्रेक्षकांना हसवेल.

गेल्या वर्षी रिलीज झालेल्या ड्रीमगर्ल्समध्ये मनजोत सिंह आयुष्मान खुरानासोबत दिसला होता. तिथेच वरुण शर्मा ‘छिछोरे’मध्ये दिसला होता. रिचा चड्ढा कंगना रनौतसोबत ‘पंगा’ या चित्रपटात दिसली होती. ‘पंगा’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.हेही वाचा

पुढच्या वर्षी सुरु होणार 'सिंघम ३'ची शूटिंग, अजय देवगनसोबत दिसणार 'हा' सुपरस्टार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा