Advertisement

Coronavirus Updates: १४ एप्रिलपर्यंत लोकल बंद

३१ मार्चपर्यंत बंद असणारी लोकल १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याच निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतला आहे.

Coronavirus Updates: १४ एप्रिलपर्यंत लोकल बंद
SHARES

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळं राज्य सरकारनं गर्दीच्या ठिकाण जाण टाळा असं आवाहन केलं. नागरिकांच्या सुरक्षेसाठी गर्दी होणारी ठिकाण बंद केली. तसंच, मुंबईची लाइफलाइनही बंद केली. ३१ मार्च पर्यंत लोकल बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्यांदा जनतेला संबेधित केलं असून, २१ दिवस लॉकडाउन करण्याची घोषणा केली. त्यामुळं आत ३१ मार्चपर्यंत बंद असणारी लोकल १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याच निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतला आहे. 

कोरोनामुळे २१ दिवस लॉकडाउन करण्याची घोषणेमुळं १४ एप्रिलपर्यंत लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्याही बंद राहणार आहेत. याआधी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रेल्वे मंत्रालयानं मुंबईची उपनगरीय लोकल, देशातील लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस, कोलकाता मेट्रो सेवा ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

मागील अनेक दिवसांपासून कोरोना व्हायरसमुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लोकल, लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसमधून होम क्वारंटाइनचे स्टॅम्प असलेले प्रवासी प्रवास करत होते. त्यामुळं इतर प्रवाशांच्या तक्रारीनं या प्रवाशांना एक्स्प्रेसमधून उतरविण्यात आलं. होम क्वारंटाइनचा स्टॅम्प असलेल्या प्रवाशांमुळे इतर प्रवाशांनाही याची लागण होण्याच्या भीतीनं, देशभरातील रेल्वे सेवा २२ मार्चच्या मध्यरात्रीपासून बंद केली होती. हेही वाचा -

Coronavirus Updates: नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट सुरू

Coronavirus Updates: ३० लाख लिटर दूधपुरवठा रखडलासंबंधित विषय
Advertisement