Advertisement

Coronavirus Updates: नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट सुरू

गुरूवारपासून नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट पुन्हा सुरू करण्यात आलं आहे.

Coronavirus Updates: नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट सुरू
SHARES

काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विक्रेत्यांनी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या मार्केटमधून मुंबई, ठाणे व अनेक भागांत भाजीपाल्याचा पुरवठा होतो. मात्र, बंदीचा निर्णय घेतल्यानं मोठा तुडवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु, गुरूवारपासून हे मार्केट पुन्हा सुरू करण्यात आलं आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात २१ दिवसांचे लॉकडाऊन सुरू झाले असून या काळात नागरिकांना भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी शासनानं आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. मुंबईला सुरळीतपणे भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्यासाठी मुंबईतील दादर आणि भायखळा मार्केट सुरू करण्यात आलं असून, वाशी येथील नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू होणार असल्याचं राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं.

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व कामकाज नियमितपणे सुरू झाल्यानं मुंबई शहर व परिसरातील नागरिकांना नियमित भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होणार आहे. शासनाच्या वतीनं भाजीपाला, अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी नियोजन करण्यात येत असून, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक गाड्यांना पोलिसांनी आडवू नये. त्यांना मार्गस्थ करण्यात यावे, असे आदेश छगन भुजबळ यांनी प्रशासनाला दिले आहेत. 

याबाबत त्यांनी मुंबई व नाशिक पोलीस आयुक्तांशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून माल घेऊन जाणारी आणि त्यानंतर परतणारी रिकामे वाहने पोलिसांनी तात्काळ सोडावी, असे आदेश दिले आहेत. शेतकरी व भाजीपाला विक्रेते आणि अन्नधान्य व्यापाऱ्यांनी नागरिकांना जीवनावश्यक माल नियमित उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे.



हेही वाचा -

Coronavirus Updates: प्रभादेवीत 'त्या' महिलेला करोनाची लागण

Coronavirus Updates: ३० लाख लिटर दूधपुरवठा रखडला



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा